Home » मनोरंजन » आधी आदिनाथ कोठारेचं स्पष्टीकरणं आता उर्मिलाची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

आधी आदिनाथ कोठारेचं स्पष्टीकरणं आता उर्मिलाची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

आधी-आदिनाथ-कोठारेचं-स्पष्टीकरणं-आता-उर्मिलाची-पोस्ट-चर्चेत,-नेमकं-काय-म्हणाली?

आदिनाथने आमच्यात सगळं ठीक असल्याची प्रतिक्रिय दिली आहे. आता यानंतर उर्मिला कोठारेची पोस्ट चर्चेत आली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 14 मे- ​​मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kanitkar – Kothare) यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याची जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. या चर्चेला पूर्णविराम देत आदिनाथने आमच्यात सगळं ठीक असल्याची प्रतिक्रिय दिली आहे. आता यानंतर उर्मिला कोठारेची पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं देखील आदिनाथसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. आदिनाथचा 13 मे रोजी वाढदिवस असतो, त्यानिमित्त उर्मिलाने आदिनाथसाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट इन्स्टा स्टोरील शेअर केली आहे. उर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती आणि आदिनाथ पॅराग्लाइडिंग करताना दिसत आहेत. आपण एकत्र उडी मारली, भरारी घेतली आणि आपल्याला ठावूक होतं आपण पुन्हा एकत्र भेटू आणि तसंच झालं, असं उर्मिला म्हणाली आहे. तसेच ती पुढे म्हणते की, जुन्या अमूल्य आठवणींना एक उजाळा. आदिनाथ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात कायम अशीच भरारी घे आणि तुझ्या ध्येयापेक्षाही पुढचं यश संपादन कर. माझी साथ, माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत राहतील..अशी पोस्ट उर्मिलानं नवरा आदिनाथच्या वाढदिवसानिमित्त केली होती.सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा-PSI असलेली ‘ही’ अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, मेंदी आणि हळदीचा Video Viral मागच्या काही दिवसांपासून आदिनाथ कोठारे चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ होता. तो नेहमी अमृता खानविलकरसोबत विविध ठिकाणी जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहायला मिळाला. मात्र त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी उर्मिलाने एकदाही हजेरी लावली नाही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावरूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा जोर धरताना दिसली. त्यानंतर उर्मिलाचा 4 मे रोजी वाढदिवस होता.मात्र या दिवशी देखील आदिनाथने उर्मिलाला साध्या शुभेच्छा देखील दिल्या नसल्याने, ह्या चर्चा अधिक रंगवल्या जाऊ लागल्या. मात्र ह्या सर्व गोष्टी आपल्या खाजगी आयुष्यबाबत उघडउघड बोलल्या जात असल्याने शेवटी आदिनाथने यावर प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घेतला. मीडियाला याबाबत प्रतिक्रिया देताना आदिनाथ म्हणाला की, मीडियाच्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगवल्या जात आहेत त्या केवळ अफवा आहेत. यासर्व गोष्टींकडे मी आणि उर्मिला कधीच लक्ष देत नाहीत. ती मालिकेनिमित्त कामात व्यस्त आहे तर मी गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होतो. आमच्यात असं काहीही बिनसलेलं नाही.

  Published by:News18 Trending Desk

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  Leave a Reply

  Your email address will not be published.