मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा

मनी-लाँडरिंग-प्रकरणात-अभिनेत्री-रकुल-प्रीत-सिंगची-सलग-दुसऱ्यांदा-चौकशी;-मिळणार-का-दिलासा

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक
  • Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?

Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?

Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते.

rakul preet singhs difficulties are not reducing in tollywood drugs money laundering case marathi news Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?

Rakul Preet Singh

Rakul Preet Singh : सध्या बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला (Rakul Preet Singh) मनी लाँडरिंग प्रकरणात कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने रकुल प्रीत सिंहला चौकशीसाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने सोमवारी (आज) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला तस्करी आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.

यापूर्वी, ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला सोमवारी ईडीसमोर हजर व्हायचे होते. विशेष म्हणजे याआधीही रकुल प्रीत सिंह ईडीसमोर हजर झाली आहे. आता एजन्सीसमोर हजर राहण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. या प्रकरणाबाबत मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, “रकुलला आज तपास एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रकुल प्रीतची ईडीने 2 सप्टेंबर 2021 रोजी चौकशी केली होती. याप्रकरणी अनेक तेलुगू कलाकारांचीही चौकशी करण्यात आली होती.

काय आहे नेमकं प्रकरण? 

अँटी मनी लाँडरिंग एजन्सी गेल्या चार वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणाचा तपास करत आहे. तेलंगणाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये उच्च दर्जाच्या ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला होता. हे रॅकेट एलएसडी आणि एमडीएमए आणि इतर उच्च श्रेणीतील अमली पदार्थांच्या पुरवठ्यात सामील होते.

News Reels

या प्रकरणातील आरोपींच्या ताब्यातून 30 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याने कथितरित्या तपासकर्त्यांना सांगितले की तो चित्रपटातील व्यक्ती, सॉफ्टवेअर अभियंते आणि काही कॉर्पोरेट शाळांच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवत होता. त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये टॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचे मोबाईल नंबर सापडले होते. या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला होता. त्या ड्रग कार्टेलचा पैसा विविध माध्यमातून लाँडर करण्यात आल्याचे ईडीला आढळून आले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर रकुल प्रीतचा पुढचा चित्रपट ‘छत्रीवाली’ येणार आहे. या चित्रपटात रकुल एका कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे काम त्याची गुणवत्ता तपासणे आहे. याशिवाय ती अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Pathaan: “लोकांच्या ताटात अन्न नाही, तरी कोणीतरी परिधान केलेल्या कपड्यांबद्दल संताप व्यक्त करतायत’; पठाण वादावर रत्ना पाठक शाह यांची प्रतिक्रिया

Published at : 19 Dec 2022 06:16 PM (IST) Tags: money laundering case ED rakul preet singh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *