भोसरी जमीन प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

भोसरी-जमीन-प्रकणात-एकनाथ-खडसेंच्या-पत्नीना-मोठा-दिलासा,-अंतरिम-जामीन-मंजूर

भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नीना मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

 पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 जानेवारी : भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन दिला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना दिलासा दिलासा दिला आहे. मंदाकिनी खडसेंना सत्र न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत 1 लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आधीच दिलासा मिळाला होता.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांचाही जामीन मंजूर करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीकडून गिरीश चौधरींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, राष्ट्रवादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *