भारत जोडो यात्रेमुळे कोरोना पसरण्याची भीती, भाजप नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

नितीन नांदुरकर(जळगाव), 25 डिसेंबर : मागच्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेवर कोरोनाचे संकट येण्याची शक्यता आहे. यावरून राहुल गांधी यांच्यावर यावरून टीकाही होत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल गिरीश महाजनांनी मोठं विधान केल्याने खळबळ उडाली आहे आहे.
मागच्या वर्षभरात कोरोनाच्या बाबतीत राहुल गांधींनी एवढा आकांडतांडव केला, आता इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ते एवढ्या लोकांना घेऊन फिरत आहेत. अशात दुर्दैवाने प्रादुर्भाव वाढला तर आवरण कठीण होईल. म्हणून राहुल गांधी हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना हे कळायला हवं.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, राहुल गांधींची सुरू असलेली भारत जोडो यात्रा ही काही दिवसांकरता स्थगित करावी. कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता अशा प्रकारे नागरिकांना जमा करणे हे देश हिताचं नसल्याचे देखील महाजन यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : Corona Update Maharashtra : ख्रिसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजा करा, फक्त..; कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांचं महत्त्वाचं विधान
महाजन पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय हे राहुल गांधींना कळायला हवं असं मोठं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भारत जोडो यात्रेबद्दल केले आहे. कोरोनाच्या बाबतीत राहुल गांधींनी यापूर्वी मोठा आकांड तांडव केला होता. आता इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ते एवढ्या लोकांना घेऊन फिरत आहेत.
अशातच दुर्दैवाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर परिस्थिती आवरण कठीण होईल त्यामुळे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा ही काही दिवसांसाठी स्थगित करावी अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
हे ही वाचा : India Coronavirus Cases: …तर देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार; काय आहे सरकारचा प्लॅन?
दरम्यान राहुल गांधी हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना ही बाब कळायला हवी कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता अशा प्रकारे नागरिकांना जमा करणे हे देशहिताच असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले. यावरून राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.