भारत आता पाकिस्तानचा बॉर्डरवर 'असा' करणार बंदोबस्त!

भारत आता पाकिस्तानचा बॉर्डरवर ‘असा’ करणार बंदोबस्त!
मुंबई तक
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा इस्रायलसारखी आधुनिक बनवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.
Ami Vitale
आता सीमारेषेवर सर्वत्र कॅमेरे असतील. त्यामुळे दुरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ‘तिसऱ्या डोळ्याचा’ वापर केला जाईल.
मोदी सरकार पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर 5500 सुरक्षा कॅमेरे बसवणार आहे. ज्यासाठी 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ड्रोन आणि हँड हेल्ड थर्मल इमेजर देखील खरेदी केले जात आहेत. ड्रोन्स, कॅमेऱ्यांद्वारे बॉर्डरवर नजर ठेवण्यात येणार आहे. थर्मल इमेजरचा रात्री सर्वाधिक उपयोग होईल.
आगामी काळात देशाचे लष्करी दल शत्रूचे ड्रोन शोधून त्यांना निकामी करण्यासाठी नवीन पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवू शकतं.
बीएसएफच्या तुकडीसह पंजाब पोलिसांचे 300 जवान हे बॉर्डरवर अधिक खोल गस्त घालण्यास मदत करत आहेत. जेणेकरून पाकिस्तानमधून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी होऊ शकत नाही.
NARINDER NANU