भाजपा कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच सत्तेवर आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली

मिरज–अशोक मासाळ

सांगली दिनांक ६ एप्रिल : “भाजपा पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले. पण राष्ट्रीय अध्यक्षापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण जिद्दीने काम करीत राहिले. यश-अपयशाची चर्चा न करता सर्व आंदोलने, कार्यक्रम सातत्याने करीत राहिले. तत्कालीन केंद्रीय अध्यक्ष श्री. लालकृष्ण अडवाणींच्या देशभर काढलेल्या रथयात्रेमुळे आणि त्यास मिळालेल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपाने सत्तेपर्यंत मजल गाठली. अशा लाखो कार्यकर्त्यांच्या अपार परिश्रमामुळे भाजपा केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेवर आहे. याचे आजच्या पिढीने स्मरण ठेवले पाहिजे” असे मनोगत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपाच्या स्थापन दिनानिमित्त झेंडावंदन जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सुर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, मुन्नाभाई कुरणे, गणपत साळुंखे, गौस पठाण, रमेश आरवाडे, प्रियानंद कांबळे, आबा जाधव, अक्षय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *