भाजपसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या, पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

भाजपसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या, पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन
मुक्ता टिळक यांचं निधन
पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं आज निधन झालं, त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.
- News18 Lokmat
- Last Updated :
- Pune (Poona) [Poona], India
-
Published by: Ajay Deshpande
पुणे, 22 डिसेंबर : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं आज निधन झालं, त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालावली. उद्या सकाळी 11 वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुक्ता टिळक या पुणे महापालिकेच्या माजी महापौर देखील होत्या. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.
कोण आहेत मुक्ता टिळक?
भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या अशी मुक्ता टिळक यांची ओळख आहे. मुक्ता टिळक या 2017 ते 2019 या काळात भाजपच्या पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यानंतर त्यांना 2019 साली भाजपच्या वतीने विधानसभेचं टिकीट देण्यात आलं. त्या कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करत असताना देखील त्यांनी व्हिलचेअरवर मुंबईत येत विधान परिषदेसाठी मतदान केलं होतं. त्यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.