भरधाव PMPL बसची धडक बसली अन् तो चाकाखाली सापडला, पुण्यातली दुर्दैवी घटना

पुणे, 11 डिसेंबर : पुण्यात येरवडा परिसरामध्ये अपघाताची एक दुर्दैवी घटना घडली आहे. येरवड्यात पीएमपीएल बस खाली चिरडून एक जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवड्यात पीएमपी बसच्या चाकाखाली आल्याने एक इसम चिरडला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याची सुमारास घडली. सादल बाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेल समोर हा अपघात झाला. पीएमपीएल बस क्रमांक (एम एच -14 एचयु -5044) ही मार्ग क्रमांक 148 भोसरी येरवड्याकडून चंद्रमा चौकाच्या दिशेने जात होती. त्यावेळी अचानक बसच्या मागील चाकाखाली एक व्यक्ती सापडला. बसचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
(भाजीत मीठ जास्त झाल्यानं आचाऱ्याला जागेवरच संपवलं, ढाबा मालकाच्या कृत्यानं पुणं हादरलं)
अरुंद रस्ता, बेशिस्त वाहनचालक तसंच या गर्दीच्या मुख्य चौकात हॉटेल, वाईन शॉप आणि परिसरात करण्यात येणारी बेशिस्त वाहनांची पार्किंग यामुळे या ठिकाणी अनेकदा लहान मोठे अपघात झाले आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
शेतमजूर महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकला
(पुणे : ज्याच्यासोबत सुरू होता वाद त्याला दिलं सोडून अन् भांडण सोडवणाऱ्यावरच कुऱ्हाडीने वार)
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे एका शेतमजूर महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये संगीता रमेश आडके या शेतमजूर महिलेचा मत्यू झाला असून या महिलेस अज्ञात व्यक्तीने डोक्यात मारहाण करून तिला गंभीर जखमी करून भीमा नदीचे पाण्यात फेकून दिले. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.