भडगाव कोविड सेंटर ला दिड लाख रुपयांचे पलंग व गाद्या भेट

जळगाव

कजगाव (संजय महाजन) येथील व्यापारीवर्ग व ग्रामस्थांनी भडगाव कोविड सेंटर ला दिड लाख रुपयांचे पलंग व गाद्या महसुल दिनाचे औचित्य साधून दि.१ रोजी भेट दिल्या प्रसंगी तहसीलदार माधुरी आंधळे कजगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, दिनेश पाटील सह व्यापारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
गेल्या दोन महिन्या पासुन भडगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे या ठीकाणी शासन स्थरातून सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे अनेक लोक लोकसहभागातून मदतीचा प्रयत्न करत हातभार लावत आहे कजगाव येथुन देखील काहि मदत दिली पाहिजे या भावनेतून कजगाव चे उद्योजक दिनेश पाटील यांनी व्यापारी व ग्रामस्थांशी चर्चा करून लोकसहभागातून प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन केले होते त्या प्रमाणे उद्योजक मांगीलालजी जैन,शिवाजी पाटील,वाणी समाजचे माजी अध्यक्ष वसंतराव शिनकर, कमलचंद धाडीवाल, दिलीपचंद जैन,नंदन डेव्हलपमेंट चे नितीन धाडीवाल,कापड व्यावसायिक सनी आस्वानी,गणेश कोतकर, अण्णा,उद्योजक विजय पोतदार,नरेश धाडीवाल, महालक्ष्मी स्टील चे संचालक व ग्रामस्थांनी दिलेल्या लोकवर्गणीतून पन्नास पलंग (कॉट)व शंभर गाद्या(बेड) आज दि.१ रोजी महसुल दिनी देण्यात आले प्रसंगी तहसीलदार माधुरी आंधळे कजगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील,सह व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *