'ब्रेनडेड' रुग्णाचे अवयव काढायला जाताच अचानक 'मृतदेह'…; डॉक्टरांनाही फुटला घाम

वॉशिंग्टन, 05 सप्टेंबर : मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण काही लोकांच्या बाबतीच चमत्कार होतो आणि हे लोक मृत्यूवरही मात करून पुन्हा जिवंत होतात. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलेली एक व्यक्ती अचानक जिवंत झाली. डॉक्टर त्या व्यक्तीचे अवयव काढणार तो मृतदेहामध्ये असं काही दिसलं की पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला (America man brain dead shows movement).
अमेरिकेतील 37 वर्षांचा रायन मार्लो असं या व्यक्तीचं नाव आहे. रायनला गंभीर आजार झाला. त्याला लिस्टिराया असल्याचं निदान झालं. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार आहे. यामध्ये व्यक्तीच्या मेंदूला हानी पोहोचते. रिपोर्टनुसार रायन नॉर्थ कॅरोलाइनामधील एका रुग्णालयात दाखल होता. 27 ऑगस्टला त्याला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं म्हणजे त्याच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं.
हे वाचा – धक्कादायक! नाचता नाचता अचानक जमिनीवर कोसळला तो उठलाच नाही; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू
रायनने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला मृत्यूनंतर वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. जेणेकरून त्याचं फुफ्फु, हृदय आणि यकृत कार्यरत राहिल.
फोटो सौजन्य – Mirror
30 ऑगस्टला रायनची पत्नी मेगन आणि इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी त्याला अखेरचा निरोप देणार होते. त्याचवेळी चमत्कार झाला. रायनच्या पायाची हालचाल होत असल्याचं कुणीतरी मेघनला सांगितलं.
हे वाचा – डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, कोल्हापुरातील Video
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार त्यानंतर डॉक्टरांनी त्याचं सिटी स्कॅन केलं तेव्हा त्याच्या मेंदूत हालचाल दिसली. लगेच तज्ज्ञांची समिती बोलावण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित कऱण्यात घाई केल्याचं म्हटलं. रायन ब्रेनडेड नव्हता. तो जिवंत होता. रायनची स्थिती सध्या गंभीर आहे. पण त्याच्या शरीरात हालचाल होते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.