ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

ब्रिटिश-सरकारमधील-बंड-चिघळले,-48-तासांमध्ये-39-मंत्र्यांचे-राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांच्यावरही राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. गेल्या सहा महिन्यात ऋषी सुनक आणि साजिद जाविद या दोन मंत्र्यांनी जॉन्सन सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता हे मंत्री देखील सरकारमधून बाहेर पडलेत. एका महिन्यांत दुसऱ्यांदा जॉन्सन सरकार संकटात सापडले आहे.

आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid) आणि भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जॉन्सन सरकारला गळती लागली आहे. बुधवारी अर्थ सेवा मंत्री जॉन ग्लेन, सुरक्षा मंत्री रिचेल मॅक्लिएन, निर्यात आणि समानता मंत्री माईक फ्रीअर यांच्यासह 39 मंत्र्यांनी जॉन्सन सरकारवर अविश्वास व्यक्त केला आहे.

पुढे काय होणार?

ब्रिटनमधील राजकारणात सुरू असलेल्या वादळामुळे जॉन्सन सरकारचं भवितव्य अधांतरी आहे. त्यांनी राजीनामा दिला तर नवे पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न कायम आहे.  पार्टीगेट प्रकरणात गेल्याच महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी विश्वादर्शक प्रस्ताव जिंकला आहे. आता उदरामतवादी पक्षाच्या नियानुसार 12 महिने त्यांच्यावर दुसरा अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. पण, हा 12 महिन्यांचा कालावधी कमी किंवा रद्द  करावा, अशी जॉन्सन यांच्या पक्षातील खासदारांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे अन्य कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी या खासदारांनी केली आहे. जॉन्सन यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या परिस्थितीमध्ये जॉन्सन यांनी बहुमत गमावले तर ते निवडणुकांची घोषणा देखील करू शकतात.

ब्रिटिश सरकारमध्येही बंड, 2 मंत्र्यांचा अचानक राजीनामा

जॉन्सन यांनी मात्र राजीनामा देण्यास नकार दिला आहे. ‘आपल्या राजीनाम्यानंतर लवकर निवडणुका झाल्या तर पक्षाचा पराभव होऊ शकतो. बिकट परिस्थितीमध्ये कोणत्याही पंतप्रधानांना भक्कम जनादेश मिळाला असेल तर त्यानं पुढं वाटचाल केली पाहिजे, मी देखील हेच करत आहे.’ असे जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *