ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं वार्षिक उत्पन्न किती? हा निधी नेमका येतो कुठून

मुंबई, 9 सप्टेंबर : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं आज उपचारादरम्यान वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजपदावर कोण विराजमान होणार याबाबतची चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी 2020-21 मध्ये राजघराण्याने आपली वार्षिक हिशोबांची पुस्तिका प्रसिद्ध केली होती. ज्यात राजघराण्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
या पुस्तिकेत राणी एलिझाबेथ यांच्या संपत्तीचा आकडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राणी एलिथाबेथ II यांची एकूण संपत्ती 600 दशलक्ष डॉलर इतकी आहे. मात्र त्यांची संपत्ती इतकी कशी झाली, याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
या संपत्तीचा स्त्रोत काय?
राणी एलिझाबेथ यांना दरवर्षी सरकारकडून एकरकमी निधी मिळातो. ज्याला सर्वसाधारणपणे Sovereign Grant असं म्हटलं जातं. 2020 साली ही रक्कम 86.3 दशलक्ष पौंड इतकी होती. यातील 51 दशलक्ष पौंड ही रक्कम राणीच्या संपत्तीची काळजी घेणे, राणीच्या घरात काम करणाऱ्यांचा खर्च, राणीचा प्रवास आदीसाठी राखीव ठेवला जातो. तर उरलेली रक्कम बकिंगहॅम पॅलेससाठी ठेवली जाते.
राजघराण्यासाठी ब्रिटनमधील सर्वसामान्यांच्या खिशावर भार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुस्तिकेत दिल्यानुसार, युकेतील प्रत्येक व्यक्तीमागे 77 पेन्स इतका भार येतो. री-सर्व्हिसींचचा खर्च जोडल्यास ही रक्कम 1.29 पाऊंडपर्यंत आहे. याशिवाय सार्वजनिक निधी हा राणीच्या खर्चासाठी वापरला जातो. सार्वजनिक निधी राणीच्या अधिकृत खर्चासाठी वापरला जातो.
Sovereign Grant म्हणजे काय?
2010 पर्यंत Sovereign Grant म्हणून ओळखले जाणारे अनुदान प्रत्यक्षात सरकार आणि किंग जॉर्ज 3 यांच्यातील औपचारिक करार आहे. या करारानुसार, 1730 मध्ये राजा आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना वार्षिक पेआउट बदल्यात क्राऊन इस्टेटमधून त्याचे उत्पन्न देण्याचं मान्य केलं होतं.
Big Breaking : एका युगाचा अंत; ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन
क्राउन इस्टेट म्हणजे काय?
क्राउन इस्टेट म्हणजे लंडनमधील रीजेंट स्ट्रीट, यूके समुद्र किनारे आणि बरेच काही. संपूर्ण यूकेमध्ये 14.1 अब्ज पौंड किमतीच्या स्थावर मालमत्तेचे व्यवस्थापन, क्राऊन इस्टेट त्यांच्या कारकिर्दीत राजाकडे आहे. मात्र तरीही ती राणीची खाजगी मालमत्ता नाही. याशिवाय 2018-19 साठी estate surplus 343.5 दशलक्ष पौंड होते. दुसरीकडे काही कारणास्तव क्राउन इस्टेटच्या कमाईत घट झाली तरीही त्याचे मूल्य कमी न करता राणीला अनुदान मिळत राहील. (कोरोना काळात पर्यटनावर परिणाम झाला होता)
राणीला डची ऑफ लँकेस्टर या खाजगी इस्टेटमधूनही पैसे मिळतात. डची ऑफ लँकेस्टरच्या 18000 हेक्टरपेक्षा जास्त भागावर पसरलेले असून 2020 मध्ये याची किंमत 23 दशलक्षापर्यंत पोहोचली आहे. प्रिन्स ऑफ वेल्सच्या खाजगी आणि सार्वजनिक उपक्रमांना निधी देणारी डची ऑफ कॉर्नवॉल देखील खूप मोठी आहे. यामध्ये 23 इंग्रजी देशांचा समावेश आहे. हा प्रिन्स चार्ल्स, कॅमिला पार्कर बाउल्स, प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कोरोनामुळे राणीच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला. 2020 मध्ये 20 दशलक्ष पौंडांचा मोठा फटका बसला आणि त्यांची सध्याची एकूण संपत्ती 350 दशलक्ष पौडांवर गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
tFPmOd3w
W3bZXWRA
mwudlUZY
3t18oLpK
7li3CwBN
7T1FwWj9
pn8Ub31O
IIghYNPK
asGrLNDb
LM1BeE5e