बोरिवली : लग्न लावून दिलं नाही म्हणून….; अल्पवयीन मुलीचा रागाच्या भरात भयानक..

बोरिवली-:-लग्न-लावून-दिलं-नाही-म्हणून…;-अल्पवयीन-मुलीचा-रागाच्या-भरात-भयानक.

मुंबई, 26 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांड समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतरही अनेक खळबळजनक घटना समोर येत आहेत. यातच आता मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न लावून दिले नाही म्हणून एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

बोरिवलीत एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. घरच्यांनी लग्न लावून न दिल्यामुळे रागातून हा प्रकार घडला, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

मृत मुलगी ही बोरिवलीच्या एल. टी. रोड परिसरात राहत होती. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न ठरले होते. मात्र, मुलगी अल्पवयीन होती, म्हणून कायद्यानुसार कुटुंबीयांसाठी हे लग्न अडचणीचे ठरणार होते. अशा परिस्थिती असताना कटुंबीयांनी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन महिन्यांनंतर तिला 18 वर्षे पूर्ण होणार होते. त्यानंतर हे लग्न होणार होते.

हेही वाचा – मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती

मात्र, पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, घरचे लग्नासाठी विलंब करीत आहेत, या गोष्टीचा तिला राग आला. अखेर मुलीने शुक्रवारी, 23 डिसेंबरला घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली. तसेच स्थानिकांनी याप्रकरणी बोरिवली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *