बेशर्मचा हॉट लूक पाहून ती म्हणाली व्हॉट्सअॅप नंबर दे; शाहरूखच्या उत्तराची चर्चा

मुंबई, 17 डिसेंबर: अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख आणि दीपिका पादुकोण सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमा येत्या 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमासाठी शाहरूखचे चाहते उत्साही आहेत. मात्र सध्या सिनेमावरून वाद देखील निर्माण झाला आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकिनीवरून हिंदी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हणण्यात आलं आहे. बेशरम गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीवर टीका होत असली तरी गाण्यातील शाहरुखच्या हॉट लुक तरूणी मात्र फिदा झाल्यात. अशाच एका तरूणीनं थेट शाहरुखचा व्हॉट्सअॅप नंबरच मागितला. यावर शाहरुखनं काय प्रतिक्रिया दिली पाहा.
पठाण सिनेमावरून सुरू असलेल्या ट्रोलिंगवर शाहरुख आणि दीपिका यांनी दुर्लक्ष केलं असून पठाण या सिनेमाच्या प्रमोशनकडे फोकस केला आहे. शाहरुखनं ट्विटरवरून नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्यानं थेट शाहरुखकडे त्याचा व्हॉट्स अॅप नंबर मागितला. यावर शाहरुखनं दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
शाहरुखनं ट्विटवरून चाहत्यांशी संवाद साधला. त्यानं ट्विटरवर प्रश्न उत्तरांचा गेम खेळला. शाहरुख कितीही बिझी असला तरी त्याच्या बिझी शेड्यूलमधून त्यानं थोडा वेळ काढून चाहत्यांबरोबर गप्पा मारल्या. शाहरुखशी गप्पा मारायला मिळाल्यानं त्याच्या चाहत्यांसाठी ही लकी बाब ठरली. चाहत्यांच्या प्रश्नांची शाहरुखनं फार शांतपणे आणि इंटरेस्ट्रिंग उत्तरं दिली.
हेही वाचा – Deepika Padukone :’पठाण’च्या आधी ‘या’ चित्रपटांमुळेही वादात सापडली होती दीपिका पादुकोण
I am phone and messaging unfriendly…. https://t.co/2hqe4rIIOO
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
ट्विटरवरील प्रश्न उत्तरांच्या गेममध्ये एका चाहतीनं शाहरुखकडे त्याचा व्हॉट्स अॅप नंबर मागितला. तिनं प्रश्न विचारत म्हटलं, ‘हॅलो शाहरुख सर. तुम्ही तुमचा व्हॉट्स अॅपनंबर मला शेअर कराल का? तुमच्याबरोबर बोलल्यानंतर मी नंबर डिलीट करून टाकेन’. चाहतीच्या या प्रश्नावर शाहरुखनं उत्तर देत म्हटलं, ‘मी फोन आणि मेसेजिंग अनफ्रेंडली आहे’.
त्याचप्रमाणे शाहरुखला ‘तुझी मुलं कोणता सिनेमा पाहण्यासाठी सर्वाधिक उत्साही आहेत? पठाण, जवान, डंकी?’, या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुखनं म्हटलं, ‘माझी मुलं आता अवतार 2 पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. पठाण सिनेमा जानेवारी पाहणार आहेत’. त्यामुळे शाहरुख लवकर मुलांबरोबर अवतार पाहण्यासाठी थिएटरमध्ये दिसू शकतो.
प्रश्न उत्तरांचा या खेळात शाहरुखनं चाहत्यांना फिटनेस टिप्सही दिल्या. एका चाहत्यानं पठाणमधील शाहरुखचे फिटनेस फोटो शेअर केलेत. या फोटोंसह ‘सर तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी मोटिवेशन देत आहात’, असंही म्हटलं. ‘फक्त सुरू करा आणि 7 दिवस करत राहा. तुम्ही यात अडकून पडाल. स्वतःसाठी करा आणि तुम्ही पुढे जात राहाल’, असं शाहरुखनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.