बीड : केज येथे बांधकाम मजुराला विजेचा धक्का | पुढारी


December 26, 2022 12:14 pm | E-Paper
बीड : केज येथे बांधकाम मजुराला विजेचा धक्का
Last Updated: December 26, 2022, 12:10 PM

केज; पुढारी वृत्तसेवा; केज येथील एका घराचे बांधकाम सुरू असताना एका बांधकाम मजुराला विजेचा धक्का बसला आहे. रुद्रेश शेलार (वय ४० ) असे बांधकाम मजुराचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोडजवळ एका घराचे बांधकाम चालू असताना सोमवारी (दि. २६ डिसेंबर) रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या दरम्यान बांधकाम करीत असलेले रुद्रेश शेलार यांना विजेचा धक्का बसला. बांधकाम सुरू असलेल्या घरावरून ३३ के. व्ही. विजेच्या तारा गेल्या आहेत. या घटनेत रुद्रेशच्या हाताला भाजले असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्राथमिक उपचार केले आहेत. तर पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले आहे.
- नाशिक : इलेक्ट्रिक बसच्या अनुदानासाठी महापालिकेची धडपड
दरम्यान या घरावरून गेलेल्या वीज वहिनी हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत केज नगर पंचायतीने देखील पाठपुरावा केला होता. परंतु, अद्याप त्यावर संबंधित विभागाकडून कारवाई झालेली नाही.
हेही वाचलंत का?
- Maharashtra Assembly Winter Session : “द्या खोके, भूखंड ओके…”, सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
- तब्बल 14 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा; चाकणजवळून एकास अटक
- राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या