बिग बॉसमधून बाहेर पडताच विकास मानकतलाचे स्पर्धकांवर गंभीर आरोप;; म्हणाला….

मुंबई, 01 जानेवारी: बिग बॉस’ हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. दरवर्षी चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा हा १६ वा सिझन चालू आहे. हा सीझनदेखील चांगलाच गाजताना दिसतोय. या शो मधील स्पर्धक घराघरात लोकप्रिय झाले आहेत. रोज या स्पर्धकांच्या भांडण, राडे यांची चर्चा होते. बिग बॉस 16 आता 12 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, 2022 च्या शेवटच्या दिवशी विकास मनकतला सलमान खानने शोमधून बाहेर काढले आहे. कमी मतांमुळे विकासला घराचा निरोप घ्यावा लागला होता. आता घराबाहेर येताच त्याने या शो वर गंभीर आरोप केले आहेत.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकास मनकतने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत घरातील स्पर्धकांवर आरोप केले आहेत. विकासने सांगितले की सुरुवातीच्या दिवसांत त्याला घरात त्रास सहन करावा लागला. विकास म्हणाला, ‘घरात गट तयार झाले आहेत आणि त्या लोकांनी मला त्यांच्यात मिसळण्याची संधीही दिली नाही. मला वाटते की मी चांगली कामगिरी करू शकलो असतो, पण मला संधी मिळाली नाही. वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून माझा चांगला प्रवास झाला.’
हेही वाचा – Bigg Boss 16: बिग बॉस 16 च्या फिनालेमधून सलमान खानची एक्झिट?; हा सेलिब्रिटी घेणार भाईजानची जागा
याशिवाय विकास अर्चना गौतमबद्दल बोलला. विकास म्हणाला, ‘अर्चनाच्या असभ्यपणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा तिला फटकारले जाते, पण ज्या पद्धतीने तिला फटकारले पाहिजे तसे केले जात नाही. मनोरंजन करणे, योग्य मुद्द्यांवर लढणे या खेळात सर्व काही ठीक आहे, परंतु लोकांच्या भावनांचा फायदा घेणे चुकीचे आहे. या कारणामुळे शोची पातळी घसरत जाते.’
विकास म्हणतो की तो पुन्हा एकदा शोमध्ये जाण्यासाठी तयार आहे. पण अर्चना आणि शिव ठाकरे यांना भेटायचे नाही. विकास पुढे म्हणाला, ‘गेल्या दोन टास्कमध्ये मी स्वतःला टार्गेट केले आहे असे वाटले. घरातील बाकीच्यांनी मला हे काम करू दिले नाही कारण त्यांनी स्वतःचे गट तयार केले आणि त्यांनी मिळून माझ्या विरोधात उभे केले. पण ती कामे मी करण्याचा प्रयत्न केला. एकूणच, माझा या शोमधील प्रवास माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. मी जी कल्पना केली होती त्यापेक्षा खूप वेगळं वातावरण घरात अनुभवलं आहे.”
बिग बॉस 16 ने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केल्याचं पहायला मिळालं. यंदाच्या सीझनमध्ये मैत्री, प्रेम, वाद-विवाद, अशा सर्वच गोष्टी प्रकर्षानं दिसून आल्या. बिग बॉसच्या घरातील अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या शोचे शेवटचे काहीच दिवस उरले असून यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.