बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा दिसला राखीचा रुद्र अवतार; आरोहला दाखवला इंगा

बिग-बॉसच्या-घरात-पहिल्यांदा-दिसला-राखीचा-रुद्र-अवतार;-आरोहला-दाखवला-इंगा

मुंबई, 23 डिसेंबर : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 4 आता निरोपाच्या वाटेवर आहे. बिग बॉसच्या घरात शेवटचे 2 आठवडे राहिले आहेत.  बिग बॉसच्या घरातील हा आठवडा फॅमिली वीक होता.  सगळ्या सदस्यांचे आई वडील, बायको मुलं 80 दिवसांनी घरात त्यांच्या भेटायला आले होते. सगळ्यांच्या कुटुंबियांबरोबर घरातील सगळे सदस्य मनमोकळेपणानं वागले. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र सदस्य पुन्हा जुन्या मोडमध्ये आलेत. घरातील शेवटच्या वीकचा कॅप्टन होण्यासाठी सगळ्यांचा वाद पाहायला मिळणार आहे. अशातच घरात अपूर्वा आणि आरोहचा वाद मात्र चांगलाच भडकताना दिसणार आहे. मात्र हा वाद आरोहला चांगलाच महागात पडला आहे. अपूर्वाला वापरलेल्या अपशब्दावरून राखीनं मात्र आरोहला खडे बोल सुनावलेत.

आरोह आणि अपूर्वाच्या भांडणाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात आरोह म्हणतोय, ‘कोण समजतेस तू स्वत:ला नेमळेकर’. यावर ‘तू कोण आहेस आधी ते बघ आधी तू कोण सांगतोस’, असं अपूर्वा म्हणते. त्यानंतर आरोह तिला ‘चल चल निघ’, म्हणत तिचं म्हणणं धुडकावून लावतो. यावर अपूर्वाला त्याला, ‘स्वत: काय बोलतो. हड तूडची भाषा बोलतो’, असं प्रत्युत्तर देते. अपर्वाच्या या उत्तरावर आरोह तिला ‘फाल्तू बाई आहेस तू. मुर्ख बाई आहेस तू एक नंबरची’, असं म्हणतो.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : मेघा धाडे अन् सई लोकूर पुन्हा बिग बॉसमध्ये? Video व्हायरल

आरोह आणि अपूर्वाची ही भांडणं राखी लांबून पाहत असते. मात्र आरोह अपूर्वाला फाल्तू बाई म्हणताच राखीचा राग अनावर होतो. हातात असलेला पाण्याचा ग्लास तो अरोहाच्या तोंडावर ओतून रिकामा करते आणि ‘फाल्तू बाई कधीही म्हणायचं नाही’, असं आरोहला खडसावून सांगते.

राखीच्या या कृतीनंतर सगळेच थक्क होतात. राखीचा हा अवतार पाहून आरोह देखील चकीत होऊन तिच्याकडे पाहत बसतो. तर अपूर्वा देखील राखी आपली बाजू घेत असल्याचं पाहून अवाक होते. बिग बॉसच्या आजच्या भागात नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच कोणाला घरातील शेवटच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी 4 ची ग्रँड फिनाले 8 जानेवारीला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कलर्स मराठी वाहिनीकडून कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. कलर्स मराठीवर 9 जानेवारीपासून 2 नव्या मालिका 9.30 आणि 10.00 या वेळात सुरू होत आहेत. त्यामुळे बिग बॉसचा ग्रँड फिनाले हा 8 जानेवारीला होणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *