कोल्हापूर:संजय पाटील
बाबासो मारुती कुंभार
सहा. शिक्षक, श्री. विलासराव शामराव तळप – पाटील माध्यमिक विद्यालय,
गोगवे ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.विज्ञान विषयाचे तज्ज्ञ अध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी; म्हणून सतत कार्यरत. विज्ञान विषयाचा पुनर्रचित पाठ्यक्रम, अविरत प्रशिक्षण आणि आय.सी.टी. विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाचेही जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम केले आहे. शाळेतील सांस्कृतिक, क्रीडा आणि महाराष्ट्र छात्र सेना विभागात सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या या बहुमोल कार्याचा गौरव व्हावा; म्हणून
आणि यापुढेही त्यांच्या हातून उत्तुंग कार्य घडण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांना
‘डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार’
देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुवर्य डी.डी.आसगावकर संस्थापक,सचिव, सांगरुळ शिक्षण संस्था, सांगरुळ यांनी कोल्हापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या सांगरुळ शिक्षण संस्थेचा शाखाविस्तार केला. या हीरकमहोत्सवी संस्थेच्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकंदर १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे एकूण
३०० कर्मचारी असून सुमारे ७००० विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सचिव पदावरुन संस्थेचा हा डोलारा यशस्वीपणे सांभाळत डी. डी. आसगावकर सरांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या विकासात सक्रिय सहभाग घेतला. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थतीतही असंख्य गोरगरिबांचे संसार उभे
राहिले. त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, उच्चपदस्थ अधिकारी बनून सेवा बजावत आहेत. असे अलौकिक कार्य करणाऱ्या या विभूतीच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कार वितरण प्रसंगी आम.प्रा.जयंत आसगावकर,शिक्षणाधिकारी किरण लोहार आम.चंद्रकांत जाधव,आम. ऋतुराज पाटील तसेच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा. आमदार प्रा. जयंत दि.आसगावकर अध्यक्ष
गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
बाबासो कुंभार यांना पुरस्कार मिलेल्याबद्दल शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.