बस वृद्धाच्या अगांवरून गेली तरीही बचावला, मुंबईतला LIVE VIDEO

मुंबई, 15 डिसेंबर : तुमच्याबाबतीत पुढच्या काही सेकंदात काय घडणार आहे याबाबत तुम्हाला कोणतीही कल्पना नसते. परंतु तुमच्यावर अचानक अपघाती संकट आलं आणि तुम्ही त्यातून वाचता त्यावेळी तुम्हाला नवा जन्म मिळाल्यासारखे वाटत. अशीच एक घटना मुंबईच्या पवई भागात घडली आहे त्यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे. एक वृद्ध बसच्या खाली आल्याने मोठी घटना घडली पण त्या वृद्धाला कोणतीही इजा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
दरम्यान चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने आणि नशिबाने मुंबईत बसला धडकलेल्या एका वृद्धाचा जीव वाचला. ही घटना मुंबईच्या पवई भागातील असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या या वृद्धाची आधी बसच्या पुढच्या भागाला धडक बसली आणि नंतर तो बसखाली पडला.
#मुंबई पवईमध्ये बसने दिली वृद्धाला धडक, थोडक्यात वाचला जीव pic.twitter.com/K6SsjxdFcA
— News18Lokmat (@News18lokmat) December 15, 2022
हे ही वाचा : आई ही आई असते, ती वेळ प्रसंगी आपल्या बाळासाठी प्राण देखील देऊ शकते, एकदा हा Video पाहा
त्यावेळी रस्त्यावर अनेक वाहने असल्याने बसचा वेग खूपच कमी असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. जास्त उंचीवर बसलेल्या ड्रायव्हरला बस ओलांडताना वृद्ध दिसला नाही. त्यामुळे वृद्ध बसखाली आले.
हे ही वाचा : Viral Video : चोराचा शहाणपणा अंगाशी आला; त्याच्या कल्पनेपेक्षा हुशार निघाला दुकानदार
मिळालेल्या माहितीनुसार, बस खाली आल्यानंतर वृद्धांनी आरडाओरडा केला. हे ऐकून बस चालकाने लगेच ब्रेक लावला. आजूबाजूचे लोकही वृद्धाला वाचवण्यासाठी धावू लागले. मात्र, बसच्या टायरखाली वृद्ध आले नाहीत ही कृतज्ञतेची बाब आहे. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्याचे फुटेज दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.