फिफा वर्ल्ड कप अन् नोरा फतेहीचा जलवा; अभिनेत्रीच्या कामगिरीने जिंकली मनं

मुंबई, 19 डिसेंबर : भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल आणि डान्सर नोरा फतेहीने फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम फेरीपूर्वी फिफा विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभात आपला दमदार परफॉर्मन्स दिला. तिच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा डान्स आणि गायनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत असलेला पहायला मिळत आहे.
जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हटल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत कामगिरी करून नोरा फतेहीचा लौकिक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वाढेल. सामन्याच्या अगोदर, नोराने ‘लाइट द स्काय’ हे गाणे सादर करण्यासाठी बल्कीस, रहमा रियाद आणि मनाल यांच्यासोबत दिसली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, नोरानं गाणं गायले आणि त्यावर डान्सही केला. मध्येभागी येत तिने हिंदीमध्ये आवाज काढला आणि चाहत्यांना तिचा अभिमान वाटला.
हेही वाचा – Raveena Tandon Fifa : रवीना टंडनने मुलगा रणबीरसोबत पाहिला FIFA सामना, व्हिडीओ व्हायरल
दोहा येथील लासेल स्टेडियममध्ये समारोप सोहळ्याला सुरुवात झाली तेव्हा वातावरण भलतंच होतं. संपूर्ण स्टेडियम विद्युत रोषणाईनं उजळून निघालं होतं. फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करणाऱ्या बॉलीवूडच्या नोरा फतेहीने फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना स्नीकर्सची एक जोडी भेट दिली. नोरा फतेहीसह सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अनेक लोक नोराचे कौतुक करताना दिसले.
दरम्यान, या ऐतिहासिक सामन्यासाठी नोराने काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेससोबत ब्लॅक स्टॉकिंग्ज घातले आहेत. अशा संधी वारंवार मिळणे म्हणजे नोरा तिच्या करिअरमध्ये खूप वेगाने प्रगती करत आहे. यावेळी फिफा वर्ल्ड कपमध्ये दीपिका पदुकोण, मौनी रॉय, मानुषी छिल्लर, शाहरुख खानसह अनेक मोठे सेलिब्रिटी दिसले.
फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम फेरीचा भव्य सामना पाहण्यासाठी अनेकांनी आपली उपस्थिती लावली होती. फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहणे हे प्रत्येक फुटबॉल चाहत्याचे स्वप्न असते. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्यासाठी बॉलिवूडकरांनीही ग्लॅमरस तडका लावला. अनेक कलाकारांनी कतारला जात या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.