फळबागायतदार व व्यापाऱ्यांनी तडजोडीने व्ही.पी.यु. रॅकचा लाभ घ्यावा खासदार रक्षाताई खडसे

जळगाव

रावेर प्रतिनिधी उमेश कोळी
कोरोना काळात सुरु झालेल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना त्यांचे केळी फळपीक मेट्रो सिटीज मध्ये सहजतेने विकता यावे यासाठी पंतप्रधान किसान रेल्वेची मुहूर्तमेढ रचली गेली. याला शेतकऱ्यांकडून व व्यापाऱ्यांकडून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. मेट्रोसिटीजमध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीकाला मागणी वाढून छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नातही हातभार लाभला. मेट्रो सिटीजमधली वाढती मागणी लक्षात घेऊन फळपीक बागायतदार यांनी वाढीव व्ही.पी.यु. रॅक मिळणेबाबत खासदार रक्षाताई खडसे यांना विनंती केली होती. शेतकऱ्यांची रास्त मागणी हेरून केंद्रातून खासदारांनी वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध करून दिले. व्यापारी व शेतकऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे वाढीव रॅक भारणेबाबत मतमतांतर निर्माण झाली. यात खासदारांनी मध्यस्ती करत शेतकरी व व्यापारी यांच्यातला ताळमेळ साधून शेतकऱ्यांच्या हितार्थ व्ही.पी.यु.रॅकची समसमान विभागणी केली.

कष्टाळू शेतकऱ्यांच्या हितार्थ व्यापाऱ्यांनी तडजोडीचे धोरण अंगिकारले पाहिजे. शेतकऱ्यांशिवाय व्यापार होऊ शकत नाही याची जाणीव व्यापाऱ्यांनी ठेवणे आवश्यक असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन उत्कर्ष साधला जाऊ शकतो. व्ही.पी.यु.रॅक नियोजनबद्ध व समसमान विभागून व्यापारासह आर्थिक प्रगती साधता येऊ शकते. त्यासाठी सामंजस्याचे धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कृतिशीलता दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठीच आज व्यापारी युनियन ससावदा, किसान मंडळ सावदा आणि फळबागायतदार शेतकरी मंडळ रावेर यांची खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली गेली. सदर बैठकीचा सकारात्मक परिमाण निघून प्रथम रॅक भरणा करण्याचे प्राधान्य किसान मंडळ सावदा यांना मिळाले असून त्यांच्या पाठोपाठ फळबागायतदार शेतकरी व्यापारी युनियन सावदा यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर जीएस स्पेशल सहा कोच किसान मंडळ सावदा तर अठरा कोच फळबागायतदार शेतकरी मंडळ सावदा अशी विभागणी करण्यात आली आहे. रेल्वे व्यवस्थापनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत झालेल्या तडजोडीबाबत सूचित करण्यात आले असून केलेल्या नियोजनानुसार सुरळीत व्यवहार सुरु झाल्यास व्यापाऱ्यांसाठी आणखी व्ही.पी.यु. रॅक वाढविण्याबाबत केंद्रातून मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यापाऱ्यांना दिले. यावेळी मोठ्यासंख्येने फळपीक शेतकरी व्यापारी युनियनचे सदस्य व व्यापारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *