'फक्त आदित्य ठाकरेंचंच नाव का घेतात?', नितेश राणेंनी केली मोठी मागणी

'फक्त-आदित्य-ठाकरेंचंच-नाव-का-घेतात?',-नितेश-राणेंनी-केली-मोठी-मागणी

sushant singh rajput and disha salian death case : nitesh rane demands narco test of aditya thackeray

सुशांतसिंग राजपूतची त्यावेळची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोन 44 कॉल्स आलेले होते. एयू नावाने आले होते आणि एयू चा अर्थ आदित्य उद्धव असा असल्याचा दावा खासदार राहुल शेवाळेंनी केला. शेवाळेंच्या या दाव्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीये.

नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की, महाराष्ट्रात इतके राजकारणी आहेत, पण जेव्हा जेव्हा सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियनचा प्रश्न येतो. मुद्दा काढला जातो, तेव्हा फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं? तेव्हा दुसऱ्या राजकारण्याचं नाव का घेतलं जात नाही? का उल्लेख केला जात नाही. दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाहीये का? कुठे न कुठे दाल में कुछ काला हे म्हणून तर एकाच माणसाचं सातत्यानं नाव घेतलं जातं.”

आमदार नितेश राणे असंही म्हणाले की, “सुशांतसिंग राजपूत आलं की, आदित्य ठाकरे. रिया चक्रवर्ती आलं की, आदित्य ठाकरे. दिशा सालियन आलं की, आदित्य ठाकरे. इतके सगळे लोकं… आतापर्यंत मी असेल, नारायण राणे हे असतील, अमित साटम असतील, अतुल भातखळकर आम्ही सगळे याबद्दल बोलत होतो. त्याचबरोबर सुशांतसिंगचे फॅनही वारंवार बोलत आहेत. याची चौकशी व्यवस्थित करा.”

‘राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते’, नितेश राणे काय म्हणाले?

“काल ज्यांनी लोकसभेत हा विषय बाहेर काढला, ते राहुल शेवाळे कोण आहेत? ते मातोश्रीच्या पहिल्या किचन कॅबिनेटमध्ये होते. ह्यांचे लाडके होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्ष काम केलेलं आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

“काल मी आदित्य ठाकरेंची भूमिका ऐकली, मी त्याला (राहुल शेवाळे) काडीची किंमत देत नाही. पण, स्थायी समिती अध्यक्ष असताना, खासदार असताना जेव्हा तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचा तेव्हा राहुल शेवाळेला किती किंमत होती, तेही तुम्ही सांगा?”, असा सवाल नितेश राणेंनी केलाय.

“आता जेव्हा त्यांच्याच किचन कॅबिनेटमधला एक खासदार बाहेर येऊन जेव्हा सांगतोय की, रिया चक्रवर्ती आणि त्याच्यामध्ये जे 44 कॉल्स झाले, त्यामध्ये AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे. तर मग याची चौकशी झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही लोक बोलत होतो, त्यापेक्षा महत्त्वाची भूमिका राहुल शेवाळेंनी घेतली आहे,” असंही राणेंनी म्हटलं आहे.

“माझं स्पष्ट मत आहे की, एकदा तुम्ही आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, या दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणात. जसं आता श्रद्धा वालकरच्या केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं, तशीच आदित्य ठाकरेंची एकदा नार्को टेस्ट करा. म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य. आता विकृतीचं नाव एकसमान झालंय असं दिसतंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा आणि दिशा सालियन व सुशांतसिंग प्रकरणातील सत्य बाहेर येऊ द्या,” अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

शिंदे-फडणवीसांकडे नितेश राणेंची मागणी

“दिशा सालियनची केस आजही मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे नाही. सीबीआय सुशांतसिंग राजपूत केसचा तपास करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन की, दिशा सालियनची केस ती पुन्हा खुली करा. चौकशी करा. 8 आणि 9 जूनच्या रात्री काय झालं? कशामुळे सुशांतसिंग राजपूतची हत्या करण्यात आली. रिया चक्रवर्तीचा त्या काय सहभाग आहे. दिशा आणि सुशांतसिंग प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज गायब का आहे? व्हिजीटर बुकची 8 आणि 9 तारखेची पान का फाडली गेली. आजपण दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बाहेर आलेला नाही. तिची आत्महत्या होती, तर एवढ्या गोष्टी का लपवल्या जातात. आता सगळे बोलायला लागले आहेत की, आदित्य ठाकरेची चौकशी करा. त्यामुळे नार्को टेस्ट करा आणि सत्य बाहेर आणा,” अशी भूमिका नितेश राणेंनी मांडलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *