प्रसिद्ध अवॉर्डच्या नामांकन यादीवरून भडकले लेखक क्षितिज पटवर्धन

मुंबई, 16 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीत काही अवॉर्डची प्रेक्षकांप्रमाणे कलाकार देखील आतूरतेनं वाट पाहत असतात. असाच एक अवॉर्ड म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या अवॉर्डचा नामांकन सोहळा नुकताच संपन्न झाला. वर्षभरातील सिनेमांची, कलाकारांची नावं या अवॉर्डसाठी नामांकित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्डसाठी फेवरेट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक, चित्रपट, गीत गायक, गायिका, नायिका खलनायिका अशा अनेक कॅटरेगीमध्ये अनेकांना नामांकन मिळाली मात्र यात फेवरेट लेखक आणि गीतकार नामांकन देण्यात आलेली नाहीत. या नामांकनावर प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोस्ट शेअर टोला लगावला आहे.
लेखक क्षितिज पटवर्धन यांनी आजवर अनेक दर्जेदार सिनेमांची गाणी लिहिली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनी’ सिनेमातील गाणी क्षितिज यांनी लिहिली आहेत. ‘नजर काढ देवा’, ‘तमाशा’, ‘टाईमपास 3’, ‘डबल सीट’, ‘फास्टर फेणे’, ‘माऊली’ सारख्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. लेखन केलं आहे. सिनेसृष्टीत एक लेखक आणि गीतकार म्हणून काम करताना आपल्या कामाची दखल घेत नसल्याचं महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या नामांकन यादीतून समोर आलं आहे.
हेही वाचा – हॉलिवूडच्या ‘अवतार’ मुळे मराठी सिनेमाचे हाल; ‘व्हिक्टोरिया’च्या निर्मात्यांनी घेतला हा निर्णय
महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या नामांकन यादीवरून क्षितीज पटवर्धन यांनी पोस्ट लिहिली आहे, त्यांनी म्हटलंय, ‘महाराष्ट्राला फेवरेट गायक आहे, गायिका आहे, संगीतकार आहे, गीतकार नाही. महाराष्ट्राला फेवरेट चित्रपट आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक नाही. गाण्यातून शब्द काढून बघा, सिनेमातून संवाद काढून बघा आणि सांगा ते तेवढे फेवरेट होतील का? लेखर आणि गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर महाराष्ट्राचे कसे होणार?’
त्याचप्रमाणे क्षितिश पटवर्धन यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रेक्षकांना आवाहन देखील केलं आहे त्यांनी लिहिलंय, ‘काय वाटतं तुम्हाला ?? अजून दोन कॅटेगरी वाढवून लेखक आणि गीतकार यांनाही तितकंच मानाचं स्थान दिलं तर??’
क्षितिश पटवर्धन यांच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, लेखकांनी समर्थन दिलं आहे. अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती जोग, अन्विता फलटणकर, रसिका सुनील, अमित फाळके, इरावती कर्णिक यांनी या पोस्टला समर्थन दिलं आहे. तसंच युवा लेखक प्राजक्त देशमुखनं यावर ‘रोजचं मढं’ असं मत व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.