प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला ट्रकने दिली धडक; थोडक्यात बचावला जीव

मुंबई, 6 डिसेंबर : मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. ‘इमली’ मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री हेतल यादवचा अपघातच झाला आहे. रविवारी रात्री ही अभिनेत्री एका मोठ्या अपघाताची बळी ठरल्याची बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून घरी परतत असताना हेतलच्या कारला ट्रकने धडक दिली, त्यानंतर तिला शॉक लागला. तिच्या अपघाताच्या बातमीमुळे सध्या तिच्या चाहत्यांना, मित्र-परिवाराला आणि कुटुंबालाही मोठा धक्काच बसला आहे.
टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘इमली’ मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेतल यादवसोबत घडलेल्या अपघाताची बातमी सध्या तुफान व्हायरल होत आहे. हेतल रविवारी रात्री शूटिंग पूर्ण करून घरी परतत होती. ती तिची कार स्वतः चालवत होती. त्यानंतर एका ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अभिनेत्रीने TOI शी बोलताना तिच्या अफघाताची बातमी दिली.
हेही वाचा – lucky Ali : प्रसिद्ध गायकाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण; फेसबुक पोस्टद्वारे केलं मदतीचं आवाहन
हेतल यादवने सांगितले की, रविवारी रात्री 8:45 च्या सुमारास ती पॅक करून फिल्मसिटीहून निघाली होती. अभिनेत्री जेव्हीएलआर हायवेवर पोहोचताच एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात हेतल यांची कार उड्डाणपुलाच्या काठावर येऊन महामार्गावरून खाली पडण्याच्या बेतात होती. मात्र, नंतर त्यांनी थोडे धाडस दाखवून गाडी थांबवली आणि पोलिसांना माहिती देण्यासाठी मुलाला बोलावले. या घटनेनंतर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. तिचे चाहतेही तिच्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या अपघातात हेतल यादवला गंभीर दुखापत झाली नाही, अपघाताची शिकार झालेली हेतल दुसऱ्या दिवशी सकाळीच शूटिंगला पोहोचली. तिने सांगितले की, मला इजा झाली नाही आणि सकाळी लवकर सेटवर जावे लागले कारण ते शोमधील एका महत्त्वाच्या सीक्वेन्सचे शूटिंग करत होते आणि माझ्यामुळे शूटिंग थांबू नये असे मला वाटत होते.
हेतल यादव सध्या ‘इमली’ या सुपरहिट शोमध्ये शिवानी राणाची भूमिका करत आहे. या अभिनेत्रीने गेल्या 25 वर्षांत छोट्या पडद्यावर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. हेतलला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘ज्वाला’च्या व्यक्तिरेखेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.