प्रवाशी व विध्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या अधिक फेऱ्या

पुणे

 

दौंड : सनी पानसरे

दौंड तालुक्यातील विद्यार्थी व इतर प्रवाश्यांच्या सेवेसाठी दौंड आगाराने विद्यार्थी व प्रवासी यांच्या मागणीनुसार एसटी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असुन गुरुवार (ता.११) रोजी पासून बस फेऱ्यात वाढ केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात एसटी बसची सेवा पूर्ण बंद करण्यात आली होती, शासनाने हळूहळू लॉकडाऊनमध्ये स्थितील करण्यात आले. यावेळी प्रवासी संख्या कमी असल्याने संबंधित आगार प्रशासनाने बस फेऱ्यांमध्ये बदल केला होता. तसेच १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय चालू होणार असल्याने विध्यार्थ्यांच्या सेवेसाठी दौंड आगारने एसटी बसच्या फेऱ्यात पूर्ण क्षमतेने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी दौंड येथून सिद्धटेकसाठी सकाळी ८, ११:३० व दुपारी १२:३० वाजता, दौंड येथून भोळेबावाडीसाठी सकाळी ६ व ११:१५ वाजता, दौंड येथून १० व दुपारी ०३ वाजून १५ मिनिटांनी मलठण, चौफुला येथून सकाळी ६:४५, ८, ९:३० तर दुपारी १२:१५, १:३०, ३, ६ व ८:१५ वाजता बस बारामतीसाठी रवाना होणार आहे. तसेच संबंधित सर्व एसटी बस इच्छित ठिकाणी जाऊन पुन्हा वेळेत माघारी येणार असल्याचे दौंड आगार व्यवस्थापक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *