प्रभास नक्की कोणाच्या प्रेमात? रामचरणने अखेर सांगूनच टाकलं

मुंबई, 30 डिसेंबर : सिनेविश्वातील ‘बाहुबली’ प्रभासची गर्लफ्रेंड कोण? हा एक प्रश्न आहे जो चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच क्रिती सेनन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. दोघेही ‘आदिपुरुष’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यानंतर अशी बातमी आली की प्रभासने क्रिती सेनॉनला चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केले आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. पण आता साऊथचा सुपरस्टार आणि RRR फेम राम चरणने प्रभासच्या गर्लफ्रेंड विषयी मोठा खुलासा केला आहे.
प्रभास नुकताच नंदामुरी बालकृष्णाच्या टॉक शो ‘अनस्टॉपेबल’मध्ये दिसला. शोच्या एका सेगमेंटमध्ये प्रभासच्या आयुष्याशी संबंधित रहस्य जाणून घेण्यासाठी राम चरणला बोलावण्यात आले होते. आता या फोन कॉल असलेल्या सेगमेंटची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राम चरणने स्पष्ट शब्दात प्रभासच्या गर्लफ्रेंड विषयी सांगितलं आहे.
हेही वाचा – ऑनलाईन शॉपिंग करणं प्रसिद्ध अभिनेत्रीला भोवलं; 10 रुपयांच्या बदल्यात हजारोंचा गंडा
प्रभासचा हा एपिसोड शुक्रवारीच रिलीज झाला आहे. एपिसोडच्या या भागात, बालकृष्णाच्या सल्ल्यानुसार, प्रभास त्याचा जोडीदार राम चरणला कॉल करतो. बालकृष्णला जाणून घ्यायचे होते की प्रभासच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे की नाही? एका फोन कॉलवर, राम चरणने पुष्टी केली की प्रभासच्या आयुष्यात सध्या एकही मुलगी नाही. मात्र, प्रभास लवकरच सर्वांना काही आनंदाची बातमी देऊ शकतो, असेही तो गमतीच्या स्वरात म्हणाला. राम चरणने हे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
#Prabhas & #RamCharan Bonding❤️
Your friendship should be like this forever #PrabhasOnAHA #PrabhasUnstoppableMania pic.twitter.com/LVH3HBIFAV — Prabhas (@WeLoveMegastar) December 29, 2022
दरम्यान, क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी बोललं जात होतं कि, आदिपुरुषच्या सेटवर या दोघांमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही.परंतु अभिनेता क्रिती सेननच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या नात्याबाबत आत्ताच कोणतीही वाच्यता करायची नाहीय.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘केजीएफ’च्या बंपर यशानंतर दिग्दर्शक प्रशांत नीलच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. या चित्रपटात श्रुती हासन पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यासोबतच प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचीही प्रतीक्षा आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर यावर गदारोळ झाला होता, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट 2023 च्या मध्यावर कधीही प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.