पूर्ण चार्जवर Mercedes-Benz Vision EQXX धावणार 1000 किमी, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

पूर्ण-चार्जवर-mercedes-benz-vision-eqxx-धावणार-1000-किमी,-जाणून-घ्या-इतर-वैशिष्ट्ये

Mercedes-Benz Electric Car: कंपनीने मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX  गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. एका चार्जवर 1000 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे. व्हिजन EQXX EV कारची संकल्पना काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आली होती.

Updated: Dec 15, 2022, 01:50 PM IST

Mercedes-Benz Electric Car: ऑटो क्षेत्रात आता इलेक्ट्रिक कारचा बोलबाला आहे. दिग्गज कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. आता लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक कार mercedes-benz EQS 580 भारतीय बाजारात लाँच केली होती. आत्तापर्यंत देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार आहे. फुल चार्जमध्ये 857 किमी धावते, असा कंपनीचा दावा आहे. आता कंपनीने मर्सिडीज बेंझ व्हिजन EQXX  गाडी बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. एका चार्जवर 1000 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा करण्यात येत आहे. व्हिजन EQXX EV कारची संकल्पना काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आली होती. मर्सिडीजने कारसाठी रिसायकल मटेरिअलचा भरपूर वापर केला आहे. ही गाडी अतिशय हलकी असून वजन फक्त 1750 किलो आहे.

बॅटरीची क्षमता

कंपनीने या कारसाठी विशेष मेहनत घेतली आहे. कामगिरीपेक्षा कार्यक्षमतेवर अधिक भर दिला आहे. या कारमध्ये जबरदस्त 100kWh इलेक्ट्रिक बॅटरी असून 244 अश्वशक्ती (180kW) जनरेट करते. ही बॅटरी 900V इतक्या गतीने चार्जिंगला सपोर्ट करते. गाडीची रेंज वाढवण्यासाठी छतावर एक सोलर पॅनल देखील ठेवण्यात आले आहे. यामुळे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते. सोलार पॅनेल मागील खिडकीला देखील कव्हर करतात. त्यामुळे वाहन चालवताना अडचण येऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही दररोज 20KM दूर ऑफिसला जात असाल आणि महिन्यातून 25 दिवस ऑफिसला जावे लागत असेल. तर या गाडीची बॅटरी पूर्ण महिना टिकेल.

बातमी वाचा- Apple Car: अ‍ॅपल कारबाबत उत्सुकता शिगेला, किंमत आणि कधी होणार लाँच? जाणून घ्या

मर्सिडीजची ही इलेक्ट्रिक कार डिझाईनच्या दृष्टीने अतिशय आकर्षक आहे. समोर, एक LED लाइटबार आहे. या लाईटच्या प्रकाशामुळे गाडी उठून दिसते. मर्सिडीज बेंझचा लोगो बोनेटवर स्टिकर म्हणून दिलेला आहे. त्याची रचना अत्यंत एयरोडायनामिक ठेवण्यात आली आहे. यात फ्लश डोअर हँडल्स देखील आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *