पुतण्याने मार्बल कटरने काकीचे केले 10 तुकडे आणि… श्रद्धा वालकर मर्डर केस सारखी भयानक घटना

पुतण्याने-मार्बल-कटरने-काकीचे-केले-10-तुकडे-आणि…-श्रद्धा-वालकर-मर्डर-केस-सारखी-भयानक-घटना

Crime News :  श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच यातही आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकून दिले.

Updated: Dec 17, 2022, 08:05 PM IST

Crime News : दिल्लीचे श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण ताजे असतानाच हत्येचा आणखी एक क्रूर प्रकार समोर आला आहे. श्रद्धा वालकरची हत्या तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने केली आहे. आफताबने हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. असाच काहीसा प्रकार आता राजस्थानात (Jaipur Crime) समोर आला आहे. 

मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकले

राजस्थानच्या जयपूरमध्ये एका पुतण्याने स्वतःच्या विधवा काकीची अत्यंत निर्घुणपणे हत्या केलीय. हत्येनंतर पुतण्याने काकीच्या मृतदेहाचे ग्राईंडरने 10 तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकून दिले. हत्येनंतर आरोपीने मार्बल कटरने केलेले तुकडे जंगलात फेकून दिले होते. याप्रकरणी जयपूर पोलिसांनी आरोपी अनुज शर्मा याला अटक केली आहे. अनुजने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाच्या काही तुकडे जंगलातून ताब्यात घेतले आहेत.

हत्येनंतर मुलींना दिली माहिती

11 डिसेंबर रोजी अनुजने त्याच्या काकीच्या डोक्यात हातोडा घालून तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे मार्बल कटरने तुकडे करुन अनुजने ते जंगलात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपीने घराच्या बाथरुममध्येच मशीनने त्याच्या काकीचे 10 तुकडे केले. कळस म्हणजे हत्येनंतर त्याने काकी हरवल्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात दिली. काकीच्या मुलींनाही ती गायब झाल्याची माहिती फोन करुन दिली.

बाथरुमध्ये साफ करत होता रक्ताचे डाग

यानंतर एका बहिणीने अनुजचे घर गाठले तेव्हा तो बाथरुममध्ये रक्ताचे डाग पुसत होता. त्याला विचारले असता त्याने नाकाची शीर फुटल्याची असल्याचे सांगितले. यानंतर त्या मुलीने याची माहिती दुसऱ्या बहिणीला दिली आणि थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करताच त्याने हत्येची कबुली दिली.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनुज हा त्याच्या काकीचा सांभाळ करत होता. पण त्याचा सर्व खर्च हा त्याची काकी करत होती. मृत काकीचा एक मुलगा परदेशात आहे. अनुजला त्याच्या काकीने त्याच्यावर ओरडणे त्याला आवडत नव्हतं. त्याला मोकळेपणाने फिरायचे होते पण त्याची काकी त्याला फिरु देत नव्हती. 11 डिसेंबर रोजी त्याला दिल्लीला जायचे होते पण काकीने त्याला थांबवले. त्यानंतर संतापलेल्या अनुजने काकीच्या डोक्यात हातोडा घालून तिची निर्घुण हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *