पुण्यात NCP उपसरपंचाच्या घरी 28 लाखाची चोरी; 2 राज्यातील पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे 26 डिसेंबर : पुण्याच्या आळेफाटा येथे एनसीपीच्या उपसरपंचाच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवत 28.50 लाखाची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 6 आरोपींना क्राईम ब्रांचने अटक केली आहे. आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते. डीसीपी निमीष अग्रवाल यांनी सांगितलं की पुणे पोलिसांनी आम्हाला आरोपींबद्दल माहिती दिली होती. याच आधारे आम्ही शोध सुरू केला.
औरंगाबाद : आईवडील खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून दोघांचं भयानक कृत्य, वाचून बसेल धक्का
लखन फुलेरी (देवास) रहमान फजल शेख (नाशिक), शुभम मालवीय (देवास), हनीफ अल्लाह बंद खान (इंदौर) भूरा उर्फ मोहमुद्दीन खान (इंदौर), सुमित शर्मा (इंदौर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी धारदार शस्त्र आणि बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबाला ओलीस ठेवलं. यानंतर त्यांनी 49 तोळे सोनं, 4 लाख रोख रक्कम अशी एकूण 28.50 लाखाची चोरी केली.
आरोपींकडून रक्कम आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की ही घटना 19 डिसेंबरला घडली होती. यातील आरोपी हनीफ आंतरराज्यीय बसवर चालक होता. यासोबतच तो स्क्रॅपचं कामही करत असे. तो आळेफाटा इथे स्क्रॅपच्या कामासाठी गेला होता. तेव्हाच त्याला याठिकाणी उपसरपंचाचा आलिशान बंगला दिसला. यानंतर त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून इथे चोरी करण्याची डाव रचला. इंदूरच्या या आरोपीने देवास आणि महाराष्ट्रातील साथीदारांसह या चोरीसाठी आंतरराज्य टोळी तयार केली होती.
Sangli : चैनीसाठी करायचा महागड्या सायकलची चोरी, वाचा कसा फसला पोलिसांच्या जाळ्यात?
आरोपी टोळीने घरात शस्त्रांसह घुसून आळेफाटा पोलीस स्टेशन परिसरात दरोडा टाकल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या प्रकरणातील टोळीतील फरार आरोपीना पकडण्यासाठी इंदूर गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू ठेवली. अखेर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी सुमारे 49 तोळे सोनं आणि 4 लाख रोख रक्कम चोरल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.