पुण्यात राष्ट्रवादीचा बोलबाला, भाजपच्या वाट्याला एकच ग्रामपंचायत!

पुणे, 18 डिसेंबर : राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातही एकूण 221 ग्राम पंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी 43 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भाजपला फक्त एकाच जागी बिनविरोध जागा जिंकता आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह सरपंचांचीदेखील थेट जनतेतून निवड होणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 167 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 वाजेपासून मतदान सुरू झालं आहे. पहिल्या दोन तासात साधारण 20 टक्के मतदान झालं आहे.
(Gram Panchayat election : जळगावात ग्रामपंचायत निवडणूक निकालाआधी राष्ट्रवादीची बाजी, भाजप दुसऱ्या स्थानावर)
हवेली तालुक्यातील गोगलवाडी या गावातही सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. आतापर्यंत 43 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. राष्ट्रवादीने आतापर्यंत २१ जागांवर बिनविरोध बाजी मारली आहे. काँग्रेसने 13 तर शिवसेना ठाकरे गटाला 3 जागांवर बाजी मारली आहे. शिंदे गट २, तर भाजपला 1 जागीच बिनविरोध म्हणून जागा मिळाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाले आहे दरम्यान त्यापैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक नऊ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. तर राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपकडे 5 तर शिंदे गटाकडे 3 ग्रामपंचायती गेल्या असून उर्वरित 122 ग्रामपंचायतीसाठी सुरू झालं आहे.
(‘हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही’ संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा)
कोल्हापूर जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत. यापैकी ४५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच राज्यपातळीवरचे नेते हे गावपातळीवर प्रचारासाठी उतरताना दिसले होते.
पुण्यातील बिनविरोध ग्रामपंचायत निकाल – ४३
काँग्रेस १३
राष्ट्रवादी २१
भाजप १
शिंदे गट २
ठाकरे गट ३
रिक्त १
संमिश्र १
पुणे जिल्हातालिकानिहाय बिनविरोध ग्राम पंचायत आकडेवारी
खेड २
आंबेगाव ५
जुन्नर ३
शिरूर ०
इंदापुर ०
बारामती ०
वेल्हे ३
मुळशी ५
भोर २४
मावळ १
बिनविरोध ४३
काँग्रेस १३
राष्ट्रवादी २१
भाजप १
शिंदे गट २
ठाकरे गट ३
रिक्त १
संमिश्र १
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मुख्य लढती
भोर – काँग्रेस, राष्ट्रवादी
वेल्हा – काँग्रेस, राष्ट्रवादी
मुळशी -काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना
इंदापूर- भाजप (हर्षवर्धन पाटील) – राष्ट्रवादी (दत्तात्रय भरणे)
जुन्नर- राष्ट्रवादी(अतुल बेनके, अमोल कोल्हे)- शिवसेना ठाकरे गट() – भाजपा (आशा बुचके)
खेड -राष्ट्रवादी(दिलीप मोहिते)- शिवसेना ठाकरे गट ()- भाजपा (शरद बुटे, अतुल देशमुख)
आंबेगाव – राष्ट्रवादी (दिलीप वळसे पाटील)- शिंदे गट (आढळराव पाटील)
शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस- (अशोक बापू पवार) ठाकरे गट शिंदे गट (शिवाजीराव आढळराव पाटील)
मावळ – राष्ट्रवादी (सूनील शेळके) vs भाजप (बाळा भेगडे, माजी मंत्री)
बारामती – राष्ट्रवादी (गटाचे राजकरण)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.