पुण्यात चाललंय काय? काल कोयतेवाल्याला धुतलं आज भर चौकात गोळीबार

पुणे, 30 डिसेंबर : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना ताजी असताना पुन्हा एकदा दहशत माजवण्यासाठी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटना वारंवार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा : विद्येच्या माहेरघरात चक्क Phd चोरी! गाईडचा प्रताप; म्हणे मी दुसऱ्या विद्यार्थिनीला शब्द दिला..
मिळालेल्या माहितीनुसार, इंम्तियाज अफजल हुसेन शेख (वय 37, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अतिक इक्बाल शेख (वय 37, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय 25), हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हा प्रकार महंमदवाडी येथील जिल्हा प्रमुख शिव अल्पसंख्याक सेनेच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी रात्री साडेसहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना ओळखतात. फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 27 डिसेंबरला भांडणे झाली होती.
हे ही वाचा : बिचाऱ्या गरिबाची काय चूक? चौघांनी भर रस्त्यात लाठ्या-काठ्याने केली मारहाण, VIDEO
त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं 22 मधील कार्यालयात आले कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन खाली पाडले. नतंर मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून फायरिंग केले. यानंतर दहशत निर्माण केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.