पुण्यात आढळला झिका विषाणूचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट, कशी घ्याल काळजी

पुण्यात-आढळला-झिका-विषाणूचा-रुग्ण;-आरोग्य-यंत्रणा-अलर्ट,-कशी-घ्याल-काळजी

पुणे, 2 डिसेंबर : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर एका गंभीर आजाराने पुणे शहरात शिरकाव केला आहे. पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळला आढळला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूळचा नाशिक येथील हा रुग्ण पुण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात तो सुरतला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. झिकाचा रुग्ण आढळल्याने पुणे महापालिकेची महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

गेल्या महिन्यात 16 नोव्हेंबरला हा रुग्ण ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी जहांगीर रुग्णालयात आला होता. यानंतर खासगी प्रयोगशाळेत या रुग्णाचे नुमने पाठवण्यात आले. त्यावेळी 18 नोव्हेंबरला तो झिका बाधित असल्याचे समोर झाले. यानंतर त्याचे नमुने हे पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आले. एनआयव्हीच्या तपासणीत 30 नोव्हेंबरला रुग्ण झिका बाधित असल्याचे निश्चित झाले.

वाचा – मोबाईल नंबरमधील या आकड्याचा आरोग्याशी खास संबंध; नसेल तर अनेक आजारांना आमंत्रण

हा झिका बाधित रुग्ण पुण्यातील बावधन येथे सध्या वास्तव्यास आहे. रुग्णाच्या तपासणीचे निदान झाल्यानंतर त्याच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. आणि त्यात एकही संशियत रुग्ण आढळला नाही. या भागात घरोघरी सर्वेक्षण, कंटेनर सर्वे करण्यात आले. पण कुठेही एडीस डास उत्पत्ती आढळली नाही. या भागात धूरफवारणी करण्यात आली, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

झिका व्हायरसची लक्षणे

झिकाची लक्षणे कधीकधी अस्पष्ट असतात. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. झिका विषाणूमुळे होणारा संसर्ग इतका धोकादायक आहे की त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येऊ शकते. गर्भवती महिलेला विषाणूची लागण झाल्यास, न जन्मलेल्या मुलामध्ये मायक्रोसेफली म्हणून ओळखला जाणारा मेंदू दोष होऊ शकतो. यामध्ये नवजात बालकाचा मेंदू आणि डोके सामान्यपेक्षा लहान होते. झिका विषाणू संसर्गानंतर लोकांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम, एक गंभीर ऑटोइम्यून डिसऑर्डर होण्याची शक्यता असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *