Home » पुणे » घर विकलं बापानं अन् जीव घेतला लेकानं; घर विकत घेणाऱ्या महिलेला अमानुष मारहाण

घर विकलं बापानं अन् जीव घेतला लेकानं; घर विकत घेणाऱ्या महिलेला अमानुष मारहाण

घर-विकलं-बापानं-अन्-जीव-घेतला-लेकानं;-घर-विकत-घेणाऱ्या-महिलेला-अमानुष-मारहाण

पुणे, 31 मार्च: पुणे (Pune) शहरातील वारजे माळवाडी परिसरात दाम्पत्यानं एका महिलेला अमानुष मारहाण (Inhuman beating) केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत संबंधित महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे.  हत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून एका आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. लता श्रीकांत माने असं मृत पावलेल्या 47 वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या पुण्यातील वारजे परिसरातील हिंगणे होम कॉलनी परिसरात वास्तव्याला होत्या. वृषाली तानाजी बोडके आणि तानाजी नथू बोडके असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी तानाजी बोडके याला अटक केली आहे. आरोपीचा कसून तपास केला जात असून लवकरच आरोपी वृषाली बोडकेला अटक होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- ऐनवेळी प्लॅस्टिकचा कागद फाटला अन् तिघेही अडकले मृत्यूच्या जबड्यात, औरंगाबादेत शाळकरी मित्रांचा दुर्दैवी अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लता माने यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी तानाजी बोडके यांच्या वडिलांकडून घर विकत घेतलं होतं. पण विकत घेतलेलं घर खाली कर, असा तागादा आरोपी दाम्पत्याने केला होता. पण विकत घेतलेलं घर का सोडायचं? यामुळे लता यांनी घर सोडायला नकार दिला. याच रागातून आरोपी दाम्पत्यांनी शुक्रवारी (25 मार्च) मृत लता माने यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत लता गंभीर जखमी झाल्या होत्या. हेही वाचा- ‘इरादा नव्हता तरीही चिरावा लागला पोटच्या लेकरांचा गळा’, सामूहिक हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा या धक्कादायक प्रकारानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी लता यांच्या ओळखीच्या सोनिया ओव्हाळ यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी तानाजी बोडके याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. विकत घेतलेलं घर खाली करण्याच्या कारणातून महिलेची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime news, Murder, Pune

Leave a Reply

Your email address will not be published.