Home » Uncategorized » पुण्यात दिवसभरात तब्बल 5 हजार 705 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 8 मृत्यूची नोंद

पुण्यात दिवसभरात तब्बल 5 हजार 705 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 8 मृत्यूची नोंद

पुण्यात-दिवसभरात-तब्बल 5-हजार-705-नवे-कोरोनाबाधित-रुग्ण,-8-मृत्यूची-नोंद

पुणे, 15 जानेवारी : मुंबई-पुण्यात कोरोनाचा अक्षरश: हाहा:कार सुरु आहे. पण मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी आता ओसरताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुण्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. पुण्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 705 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी पुण्यातील 2 आणि पुण्याबहेरील 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात आज दिवसभरात 2 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या 22 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 22 आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 22 रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पुण्यात सध्या 31 हजार 907 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात काल (14 जानेवारी 2022) 5480 कोरोना बाधितांची नोंद झाली आणि 2674 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची खएकूण संख्या 548569 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 510793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात 13 जानेवारी रोजी 5571 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि 2335 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. (भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, विराट कोहलीचा टेस्ट कॅप्टन्सीचाही राजीनामा) पुण्यात लहान मुलांना कोरोनाची लागण पुण्यात मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल चौपट मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांनो लहान मुलांची विशेष काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. पुण्यात सहा दिवसांत चारपट लहान मुले कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. बालकांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत 0 ते 11 वयोगटातील 2488 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात 0 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोनाबधितांची संख्या सहा दिवसात चारपटीने वाढली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांकडून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुलांना सर्दी, ताप, खोकला असेल तर चाचणी करुन घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. (‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच’, अखेर अजित पवारांनी शब्द मागे घेतला) मुंबईत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या आठवड्यात 20 हजारांच्या पारही गेला होता. मुंबईत आज दिवसभरात 10 हजार 661 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 21 हजार 474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 91 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत सध्या 73 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे मुंबईत काल दिवसभरात 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे कालच्या तुलनेत आजच्या नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे.

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *