Home » पुणे » पुण्यातील दुकाने सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी? अजित पवारांनी म्हटलं..

पुण्यातील दुकाने सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी? अजित पवारांनी म्हटलं..

पुण्यातील-दुकाने-सायंकाळी-7-पर्यंत-सुरू-ठेवण्यास-परवानगी?-अजित-पवारांनी-म्हटलं.

Will Pune Shops open till 7 pm from monday?: पुण्यातील निर्बंध शिथील करुन दुकानांची वेढ वाढवण्याचे संकेत एकप्रकारे अजित पवार यांनी दिले आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 01:31 PM IST

पुणे, 24 जुलै : राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. पुण्यातही रुग्णसंख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळेच पुण्यातील दुकाने (Pune Shops) सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत मोठं वक्तव्य केलं आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात सोमवार पासून दुकानांची वेळ संध्याकाळी 7 वाढवून मिळावी, अशी मागणी आहे. मी स्वत: सकारात्मक आहे पण अंतिम निर्णय सोमवारीच मुंबईतून जाहीर करणार. तिसरी लाट येऊच नये, पण तरीही प्रशासनाची तयारी सज्ज ठेवणार.

‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नसेल’ भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला

दुकानांची वेळ वाढवून देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत सोमवारी जाहीर होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात आज मोबाइल ऑक्सिजन जनरेटर व्हॅनचं उद्घाटन केलं. या व्हॅन पुणे, पिंपरी चिंचवड मनपासाठी विकत घेण्याचा आमचा विचार आहे. आपत्तीजनक परिस्थितीत ही व्हॅन ऑक्सिजन पुरवठ्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. अग्निशमन दलाप्रमाणे ही मोबाइल ऑक्सिजन व्हॅन काम करेन.. पेशंट्सचा जीव वाचवण्यासाठी या मोबाइल ऑक्सिजन जनरेटरचा फायदा होईल असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Published by: Sunil Desale

First published: July 24, 2021, 12:59 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *