Home » Uncategorized » KBC 13 – हॉटसीटवरील पुण्याच्या 'या' तरुणीसोबत अमिताभ बच्चन यांचे खास संबंध

KBC 13 – हॉटसीटवरील पुण्याच्या 'या' तरुणीसोबत अमिताभ बच्चन यांचे खास संबंध

kbc-13-–-हॉटसीटवरील-पुण्याच्या-'या'-तरुणीसोबत-अमिताभ-बच्चन-यांचे-खास-संबंध

‘कौन बनेगा करोडपती ‘ (Kaun Banega Crorepati 13) या शोचे सूत्रसंचालन करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासमोर अनेक स्पर्धक येत असतात. या स्पर्धकासोबत अमिताभ यांचं जुनं नातं आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 07 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय आणि चर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती ‘ (Kaun Banega Crorepati 13) . ’ या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नसून त्यांच्या ज्ञानातही भर पडत आहे. या शो चे सूत्रसंचालन दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन बच्चन (Amitabh Bachchan) करत आहेत. यावेळी त्यांचा काहीसा हटके अंदाज या शोदरम्यान पाहण्यास मिळत आहे आणि तो प्रेक्षकांना आवडत देखील आहे. मात्र या सेटवर त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे ते आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणजे या घटनेशी पुण्याचे खास कनेक्शन आहे. या शोचे सूत्रसंचालन करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासमोर अनेक स्पर्धक येत असतात. मात्र यावेळी या शोच्या सेटवर त्यांच्यासोबत काही तरी वेगळे घडले. त्यांना जेव्हा समजले की, त्यांच्या समोर बसलेली स्पर्धक ही त्यांच्या बॉडीगार्डची मुलगी आहे, तेव्हा अमिताभ बच्चन आश्चर्यचकीत झाले.

    ‘कौन बनेगा करोडपती ‘ च्या 6 ऑक्टोबरच्या भागात हॉट सीटवर एक अशी स्पर्धक होती जिचे वडील 30 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांचे पर्सनल बॉडीगार्ड होते. अमिताभ बच्चन यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते दंग झाले त्यांना काय बोलवे अशी त्यांची स्थिती झाली. या स्पर्धकाचे नाव रश्मी कदम  (Rashmi Kadam) आहे. रश्मी कदम पुण्याची आहे.रश्मी कदम राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळाडू राहिली आहे आणि सध्या ती पुण्यात मानसशास्त्राची सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. रश्मी कदम खूप छान खेळत होती आणि अमिताभ बच्चन सुद्धा तिचा अभ्यास पाहून आश्चर्यचकित झाले होते. शोच्या अधून मधून अमिताभ बच्चन रश्मीशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत होते. वाचा :Man Jhala Bajind : सरू आजीनंतर फुई आजीची चर्चा; रणवीर सिंगसोबत देखील केलं आहे काम वडील होते बॉडीगार्ड खेळ सुरू असताना अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रश्मी कदम यांच्या वडिलांकडे बोट दाखवून त्यांचे नाव विचारले. त्यांनी सांगितले की, माझे नाव राजेंद्र कदम आहे आणि मी पुण्याचा रहिवासी आहे. त्यांना पाहताच अमिताभ यांनी विचारले की, तुम्ही पोलिसमध्ये आहात का, तेव्हा रश्मीच्या वडिलांचे उत्तर ऐकून अमिताभ बच्चन काही काळ स्तब्ध झाले. वाचा : स्पेन व्हेकेशनदरम्यान प्रियांका चोप्राचा सुपरहॉट LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो? वडिलांनी सांगितली संपूर्ण गोष्ट रश्मीचे वडील म्हणाले की, ‘सर, मी 1992 मध्ये तुमचा पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) होतो. मी तुमचा अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड होतो. माझी इच्छा होती की, तुमच्यासोबत एक तरी फोटो काढावा. मात्र त्यावेळी मोबाईल फोनमध्ये कॅमेरे नव्हते. पण आज माझ्या मुलीमुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली यासाठी मी खूप आनंदी आहे. हे ऐकून अमिताभ बच्चन थक्क झाले. ते म्हणाले की, जग किती लहान आहे. आणि हो, तुमच्यासोबत फोटो काढण्यास मला आनंद होईल. यानंतर रश्मी कदमने पुढचा प्रश्न खेळला आणि तिने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले.

    Published by:News18 Trending Desk

    First published:

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *