Home » Uncategorized » पिंपरीत 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, गर्भपातासाठी जबरदस्ती दिली पपई आणि गोळ्या

पिंपरीत 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, गर्भपातासाठी जबरदस्ती दिली पपई आणि गोळ्या

पिंपरीत-15-वर्षीय-मुलीवर-बलात्कार,-गर्भपातासाठी-जबरदस्ती-दिली-पपई-आणि-गोळ्या

Pune: बहिणीच्या मदतीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, गर्भपातासाठी जबरदस्ती दिली पपई आणि गोळ्या (प्रातिनिधिक फोटो)

Minor girl raped in Pimpri chinchwad: एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे घडली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  पिंपरी चिंचवड, 19 सप्टेंबर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. पुणे जिल्ह्यात (Pune district) गेल्या महिन्याभरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहते. एका तरुणाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार (15 year old girl raped in Bhosari) केला आणि ज्यावेळी ती मुलगी गरोदर राहिली तेव्हा तिला जबरदस्ती पपई आणि गर्भापाताच्या गोळ्या खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी (Bhosari Pimpri Chincwad) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणीच्या मदतीने केला बलात्कार धक्कादायक म्हणजे आरोपीला या कृत्यात त्याच्याच बहिणीने मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी दत्तू पुजारी आणि त्याच्या बहिणीवर भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर काय आहे संपूर्ण प्रकरण? पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरात असलेल्या एका सार्वजनिक शौचालयात शौचासाठी पीडित तरुणी जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन तिचे तोंड हाताने बंद केले. याननंतर तिला कंबरेच्या पट्ट्याने मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. गप्प राह नाही तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. यानंतर सुद्धा वारंवार तिच्यावर आरोपीने धमकावत बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी गर्भवती झाली. गर्भवती झाल्याचे आरोपीच्या लक्षात येताच त्याने गर्भपातासाठी पीडित मुलीला जबरदस्ती पपई आणि त्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 376, 376 (2), 376 (3), 354 (ड), 324, 313, 316, 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घरात घुसून गुंडांनी अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा सराईत गुंड आणि त्याचे साथीदार गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यासोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. हे नराधम एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी पीडितेचा लैगिंक अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करेन, नाही तर तुम्हाला ठार मारले, अशी धमकी देत आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार केले होते.

  Published by:Sunil Desale

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *