Home » पुणे » उधारीचे 20 हजार मागितले, कुऱ्हाडीने 14 वार करून संपवले, पुण्यातील हत्येचा VIDEO

उधारीचे 20 हजार मागितले, कुऱ्हाडीने 14 वार करून संपवले, पुण्यातील हत्येचा VIDEO

उधारीचे-20-हजार-मागितले,-कुऱ्हाडीने-14-वार-करून-संपवले,-पुण्यातील-हत्येचा-video

पुणे, 06 एप्रिल :  मित्र अडचणीत आले तर मदत म्हणून सहज उधार पैसे देत असतो. पण, उधारीचे पैसे मागितले म्हणून एक मित्राने आपल्याच मित्राची कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून (murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (pune) घडली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी समोर ही घटना घडली. युवराज बाबुराव जाधव (34) असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

बाबुराव माणिक जाधव यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता. (गोरखनाथ मंदिर हल्ल्यासंदर्भात नवा खुलासा! मुर्तझाच्या घरातून Airgun जप्त) रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडी घेतली आणि युवराजच्या दुचाकीवरून निघाला असता पाठीमागून येऊन डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी गणेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.

 • Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

 • Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

 • BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

 • हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

 • भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

 • पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून…,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

 • पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

 • जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

 • राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

 • Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

 • Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.