पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे

12 सप्टेंबर : राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी शकुंतला धराडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झालीय. तर उपमहापौरपदी प्रभाकर वाघेरे यांची निवड झालीये.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या वेळीही राष्ट्रवादीने महापौर-उपमहापौरपदी आपल्याकडेच राखलं. विशेष म्हणजे पहिल्यांदाच महापौर म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातून धराडे या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडली. पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने याही वेळेस महापौर – उपमहापौरपदी राष्ट्रवादीचा नगरसेवक विराजमान होणार हे निश्चित होतं. त्यानुसार महापौरपदासाठी शकुंतला धराडे आणि उपमहापौरपदी प्रभाकर वाघेरे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीकडून आधीच करण्यात आली होती. त्यानुसारच धराडे यांची बिनविरोध निवड झाली.
आज फक्त निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. त्यानंतर महापौर आणि उममहापौरांनी आपल्या पदांचा कार्यभार स्विकारला. विशेष म्हणजे या वेळेस महापौरपद हे पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं होतं आणि या प्रवर्गातून महापौरपदी विराजमान होण्याचा पहिलाच बहुमान धराडे याना मिळाला आहे, धराडे या महापालिकेतील 26 व्या तर 6 व्या महिला महापौर म्हणून पुढील सव्वा वर्ष कारभार पाहणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.