शांतीलाल शर्मा
पालम आगामी नवरात्र उत्सव व ईद -ए -मिलाद सणा निमित्य पालम पोलीस स्टेंशन तर्फे आयोजन शांतता समितीची बैठक मा.उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली उपविभागिय अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जि.डी. पौळ यांनी केले तर तहसिलदार श्रीमती प्रतिभाताई गोरे यांनी सण शांततेत साजरे करण्याचे अव्हाण केले.अध्यक्षीय भाषणांत श्री.सुधिर पाटील म्हणाले की कोविड 19 असल्याने नवरात्र महोत्सव सार्वजनिक ठिकाणी न करता आपल्या घरीच साजरा करावा त्यामुळे कुटूंबातील माणसा माणसातील संवाद करता येईल तसेच संवाद वाढेल ही संधी करोनाने आपणास निर्माण करून दिली आहे पर्यावरण पुरक मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी जेने करून घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन होईल मिरवणूक न काढता सन साजरा करावा गर्दी टाळावी व पुढे बोलतांना म्हणाले की उत्सव मंडळातील पदधिकाऱ्यांनी चेहऱ्यांवरील मासचे वाटप करावेत जे नागरीक मासचा वापर करत नाहीत त्यांना समजाऊन सांगुन त्यांचे मतपरिवर्तीत करावेत नवरात्र उत्सवात सांस्कृतीक कार्यक्रम घेतले जातात तेव्हा समाजासाठी फायद्या चे आसावेत जसे रक्तदान शिबीराचे आयोजन करावे त्यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवनार नाही असे व्यक्त केले तसेच न.प. प्रशासनास सुचना देतानी म्हणाले की मूर्ती विसर्जना करिता मूर्ती संकलन केद्रं करून मूर्ती विसर्जनाची जबाबदारी न.प.घेतील असे म्हणाले शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणांत म्हणाले की उत्सव सार्वजनिक स्वरूपात न करता घरगुती स्वरूपात साजरा करावा आनंद हा घरगुतीत असावा शेवटी आभार फौजदार साने यांनी व्यक्त केले यावेळी जालिदंर हत्तीअंबिरे, पो.नि.दिपक शिंदे, गट विकास अधिकारी चकोर, अभियंता महावितरण श्री. स्वामी,माधवराव गायकवाड, न.प.चे बी.डी.कानडे,सा.पो.नि. सुनिल माने,वैजनाथ
हात्तीअंबिरे,शेख अकबर, आनंद साकला, गणेश हात्तीअंबिरे, रामप्रसाद कदम,निवृत्ती हात्तीअंबिरे,बाबासाहेब
एंगडे, रहेमतूल्ला पठाण, माधव हानवते, ताहेर पठाण, गणेश घोरपडे, ऑ.खतीब व पत्रकार,
महसूल कर्मचारी,पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य व शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
