पालम तहसिल समोर आमरण उपोषण सिरपुर चे घोटाळेबाज ग्रामसेवक स्वामी याना बडतर्फ करा

परभणी

 

शांतीलाल शर्मा
पालम तालुक्यातील सिरपुर ग्राम पंचायत चे ग्रामसेवक बी.एस. स्वामी याना बडतर्फ कराण्यासाठी तहसिल कार्यालय,व पंचायत समिती पालम समोर आमरण उपोषणचे निवेदन गौतम हनवते जिल्हा उपाघ्यक्ष रिपाई (आठवले गट ) करण्यात ऐनार आहे या निवेदंनात घोटाळेबाज ग्रामसेवक बी.एस.स्वामी यांना त्वरीत बडतर्फ करण्यात यावे,सिरपुर ते केरवाडी रस्त्याचे डांबरीकरण करवे,पी.एम. किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 4000/ -रूपये वाढ करण्यात यावी,श्रावणबाळ निराधार मासिक वेतन दरमहा वाढवावे,सिरपुर ग्रा.पंचायतचे सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचे पाच वर्षाचे थकीत मानधन तुर्त ध्यावे,गावामध्ये एल.ई.डी.बल्प त्वरीत लावावे,ग्रामीण रमाई घरकुल,प्रधानमंत्री घरकुल बजेट अडीच लाख रूपये वाढवुन द्यावे ,घरकुलाचा पहिला हप्ता 60,000 रूपये मिळवुन देण्यात यावा,तालुक्यातील आतिवृष्टी मुळे नुकसानाची सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 /- रूपये अनुदान देण्यात यावे,सिरपुर येथील नळयोजना दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावी,लॉकडाऊनमुळे दुकानदारांना प्रत्येकी 20 हाजार रूपये अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे,तालुक्यातील कुटूंब आर्थसहाय्य प्रस्ताव घुळखात पडले आहे ते त्वरीत मजुर करावे
आदी मागण्या सदर्भात पालम तहसिल समोर आमरण उपोषण करण्यात ऐनार आसल्याचे निवेदनाद्वारे सागाण्यात आले आसून या निवेदनाच्या प्रतिलिपी ग्रामविकास मंत्री मुंबई,उपविभागीय आयुप्त औरंगाबाद,जिल्हाधिकारी परभणी,मुख्यकार्यकारी अधिकारी परभणी,तहसिलदार पालम याना देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *