पाकिस्तानात 8 वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचे डोळे काढले बाहेर

कराची 01 सप्टेंबर : पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. रविवारी सिंध प्रांतातील उमरकोट भागात एका आठ वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिचे डोळे काढण्यात आले. संशयितांनी तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर वार केले. पाकिस्तानमधील एका हिंदू अधिकार कार्यकर्त्याने व्हिडिओ क्लिप ट्विट केल्याने ही घटना उघडकीस आली.
पैसे घेऊन परभणीतील मुलीचा जळगावात बालविवाह करण्याचा प्रयत्न, चागलं स्थळ आहे असे सांगत…
क्लिपमध्ये, पीडित मुलगी एका स्ट्रेचरवर दिसत आहे, तिचे पालक तिला हॉस्पिटलच्या आवारात घेऊन जाताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक महिला पीडितेच्या कुटुंबासोबत हॉस्पिटलमध्ये जातानाही दिसत आहे. महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितलं की, रक्तस्त्राव थांबलेला नाही. त्यामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
ती पुढे म्हणाली, “पीडित मुलीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने स्थानिक आपत्कालीन रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला बीआयडीएस रुग्णालयात पाठवले आहे. इथे स्त्रीरोगतज्ज्ञ तिच्या प्रकृतीची तपासणी करतील.” पीडितेला अँटिबायोटिक्सची नितांत गरज आहे, असं पीडितेसोबत असलेल्या महिलेनं मीडियाला सांगितले.
महिलेने पुढे सांगितले की, “आरोपींनी तिचा संपूर्ण चेहरा अक्षरशः ओरबाडला आहे आणि तिचे डोळेही बाहेर काढले आहेत, तिला पाहिल्यावर कोणाचाही थरकाप उडेल.” महिला म्हणाली की, पाकिस्तानमध्ये गरिबांना स्थान नाही. ‘या मुलीची अवस्था बघवत नाही, मात्र ही एकमेव घटना नाही, अशा हजारो घटना रोज घडतात पण कारवाई होत नाही. पीडित लोकांनी कुठे जायचं? सरकारने उत्तर द्यायला हवं.
माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय.. तरुणीने नकार दिला तर त्याने थेट..
एका हिंदू अधिकार कार्यकर्त्याने पोस्ट केलेल्या दुसर्या व्हिडिओ क्लिपमध्ये पीडितेच्या आईने एका न्यूज मीडियाला सांगितले की, “पीडित मुलगी एका स्थानिक दुकानात गेली पण परत आली नाही.” दुसरीकडे, स्थानिक वृत्तानुसार, “उमरकोट पोलिसांनी पीडितेला बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी शोधून काढलं.” पोलिसांनी तिला परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं आणि या प्रकरणाचा तपास केला. वृत्तानुसार, आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.