पत्नीला व्हिडिओ कॉल करुन पतीने जीवन संपवले, क्षुल्लक वादातून उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला-व्हिडिओ-कॉल-करुन-पतीने-जीवन-संपवले,-क्षुल्लक-वादातून-उचलले-टोकाचे-पाऊल

पत्नीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

पत्नीला व्हिडिओ कॉल करुन पतीने जीवन संपवले, क्षुल्लक वादातून उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला व्हिडिओ कॉल करुन पतीने जीवन संपवले

Image Credit source: Google

एटा : पत्नीसोबत झालेल्या वादातून दारुच्या नशेत पत्नीला व्हिडिओ कॉल करुन पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील जनपद एटा येथे घडली आहे. पत्नी व्हिडिओ कॉलवर पतीला अडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पतीने ऐकले नाही. या घटनेमुळे पत्नीला धक्का बसला आहे. पत्नीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. श्यामसुंदर असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या घटनेमुळे श्यामसुंदरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नीसोबत वाद झाल्याने पतीचे टोकाचे पाऊल

श्यामसुंदरचा पत्नीसोबत काही कारणावरुन वाद झाला होता. यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. यानंतर त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पत्नीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही.

पोलिसांनी नंबर ट्रेस करत घटनास्थळ गाठले

पत्नीने तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठत पतीच्या आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पतीचा नंबर ट्रेस करत घटनास्थळाचा शोध घेतला. त्यानंतर जीटी रोड स्थित सरस्वती शिशु मंदिरजवळ घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

श्यामसुंदर आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी होत्या. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. श्यामसुंदरचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला दारुचे व्यसन होते.

आत्महत्येवेळीही श्यामसुंदर दारुच्या नशेत होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी कोतवाली नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *