पुतळा

कोलकाता; वृत्तसंस्था : मॅडम तुसादमध्ये महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांचे मेणाचे पुतळे आहेत. कोलकात्यातील मदर्स व्हॅक्स म्युझियममध्ये असेच रवींद्रनाथ टागोर, शाहरुख आणि सलमान खान आहेत. कोलकात्यातील कैखाली भागातील रहिवासी तापस शांडिल्य यांनीही त्यांच्या स्वर्गवासी पत्नी इंद्राणी यांचा सिलकॉनचा पुतळा बनवून घेतला. इंद्राणी या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मरण पावल्या होत्या. त्यांचा विरह तापस यांना क्षणभरही सहन होईना. इंद्राणी सतत डोळ्यासमोर राहाव्यात म्हणून मग त्यांनी अडीच लाख रुपये खर्चून सजीव इंद्राणीचा भास होईल, असा निर्जीव पुतळा बनवून घेतला. सुबीमल दास यांनी 6 महिन्यांत तो तयार केला. आता शांडिल्य अधूनमधून या इंद्राणीच्या बाजूला बसतात. त्यांच्याशी बोलतात. तिच्या केसांतून हळुवार कंगवा फिरवितात…

अशी साकारली मूर्ती

  • विविध अँगलची इंद्राणी यांची छायाचित्रे नमुना म्हणून समोर घेतली.
  • सुरुवातीला मातीचे एक मॉडेल बनविले. नंतर फायबर मोल्डिंग केले व मग सिलिकॉन कास्टिंग.
  • कलर पिग्मेंटेशन, हेअर क्राफ्टिंग व डोळ्यांचे प्लेसमेंट करण्यात आले. हुबेहूब केशरचनेसाठीच महिना लागला.
  • मूर्तीला आसामी रेशमी साडी नेसविण्यात आली. इंद्राणी यांचे सोन्याचे दागिनेही घालण्यात आले.