पंधरा दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगला घेतला होता प्रवेश, हॉस्टेलमध्येच जीवन संपवले; कारण काय?

पंधरा-दिवसांपूर्वीच-इंजिनिअरिंगला-घेतला-होता-प्रवेश,-हॉस्टेलमध्येच-जीवन-संपवले;-कारण-काय?

नितिनचे आई-वडिल दुबईला राहतात. नितिनने 1 डिसेंबर रोजी बंगळुरुतील एएमसी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीईएसच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता.

पंधरा दिवसांपूर्वीच इंजिनिअरिंगला घेतला होता प्रवेश, हॉस्टेलमध्येच जीवन संपवले; कारण काय?

बंगळुरुमध्ये कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या

Image Credit source: Google

बंगळुरु : अज्ञात कारणातून इंडिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये आत्महत्या केल्याची घटना कर्नाटकच्या बंगळुरुमधील एएमसी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडली आहे. नितीन असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच सीईएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. याप्रकरणी बन्नेरघट्टा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

15 दिवसांपूर्वीच घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

मयत विद्यार्थी हा केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यातील कोयलांडी गावचा रहिवासी आहे. नितिनचे आई-वडिल दुबईला राहतात. नितिनने 1 डिसेंबर रोजी बंगळुरुतील एएमसी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीईएसच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहत होता.

तात्काळ रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

पंधरा दिवसातच नितिनने हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये गळा चिरुन घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. जखमी अवस्थेत नितिनच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अद्याप अनभिज्ञ

पोलिसांनी नितिनच्या रुममेट आणि अन्य विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आई-वडिल दूर राहत असून, त्यांचे आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणातून नितिनने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तपासाअंती आत्महत्येमागचे खरे कारण स्पष्ट होईल.

भिंडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

शाळेतून घरी परतत असताना स्कूलबसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन चौथीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील भिंड येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *