पंतप्रधान, कवी राजकारणी, मैं अटल हूं मधील पंकज त्रिपाठीचा पहिला लुक समोर

मुंबई, 25 डिसेंबर : भारताचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओने ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा पहिला वहिला लुक प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘मैं अटल हूं’ या चित्रपटात माजी पंतप्रधानांच्या भूमिकेत असलेल्या पंकज त्रिपाठीचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. पंकज त्रिपाठी यांचा हा लुक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या हटके अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आज 25 डिसेंबर रोजी संपूर्ण देश माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करत आहे. यानिमित्ताने पंकज त्रिपाठीने सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच सांगितले की, तो या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे आणि हे पात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण पात्र आहे. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून त्यांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, #श्रीअटलबिहारीवाजपेयीजींचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकार करण्यासाठी माझ्या व्यक्तिमत्त्वावर संयमाने काम करणे आवश्यक आहे हे मला माहीत आहे. उत्साह आणि मनोबलाच्या जोरावर मी माझ्या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, असा मला ठाम विश्वास आहे.
#ShriAtalBihariVajpayee जी के व्यक्तित्व को पर्दे पर साकार करने के लिए मुझे संयम से मेरे व्यक्तिमत्व पर काम करना जरूरी है, यह मैं जानता हूँ। स्फूर्ति और मनोबल के आधार से मैं नई भूमिका को न्याय दे सकूंगा यह अटल विश्वास मुझे है। #MainAtalHoon सिनेमाघरों में, दिसंबर २०२३। pic.twitter.com/2iwfDoZMD9
— पंकज त्रिपाठी (@TripathiiPankaj) December 25, 2022
अल्पावधीतच पंकज त्रिपाठीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. समोर आलेल्या लुकमध्ये पंकज त्रिपाठी धोती-कुर्त्यामध्ये दिसत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि उत्कर्ष नैथानी लिखित हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे संगीत सलीम-सुलेमान यांनी दिले आहे, तर गीते समीरने लिहिली आहेत. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत, मैं अटल हूं ची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी केली आहे, तर झीशान अहमद आणि शिव शर्मा सह-निर्माते आहेत.
दरम्यान, अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. प्रत्येक पात्र ते जीव ओतून करतात. बॉलिवूड असो वा ओटीटी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा उल्लेख आला तर त्या यादीत पंकज त्रिपाठीचे नाव आल्याशिवाय राहत नाही. पंकज त्रिपाठी लवकरच ‘मैं अटल हूं’ या बायोपिकमध्ये भारतरत्न अटल बिहारी यांची अजरामर भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. चित्रपटाची कथा ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिक्स अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाला म्हणजेच 25 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.