पंकजाताई मुंढे यांना पालम भाजपाच्या वतीने निवेदन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

परभणी

 

शांतीलाल शर्मा
पालम तालुका भाजपाच्या वतीने पालम तालुक्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने सरसगट शेतकऱ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विमा मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन पंकजा मुंडे यांना पेठशिवनी तालुका पालम येथील बस स्थानक येथे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, भाजपा सरचिटणीस भगवान करंजे, रमेश शिंगारे ,एकनाथराव शेठे ,तुकाराम कराळे, नागोराव कराळे ,राजेश्वर करंजे ,दत्तराव गौरकर ,संदीप पांचाळ ,विठ्ठल गीजे यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *