निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीने किल्ले मच्छिंद्रगड व सागरेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी सीड बॉल रोपण कार्यक्रम संपन्न

सांगली

मिरज- संजय पवार

निसर्ग व सामाजिक मंडळाचे राज्याचे अध्यक्ष वृक्षमित्र बाबासाहेब मोरे यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर ही पर्यावरणाची चळवळ राबवणे या चळवळीचा एक भाग म्हणून
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीने मंडळाचे राज्याचे प्रमुख संघटक बाळासाहेब चोपडे सर यांच्या संयोजनातून नुकतेच ऐतिहासिक किल्ले मच्छिंद्रगड सागरेश्वर अभयारण्य पायथ्याशी सीडबॉल चे रोपण करण्यात आले. “सायकल चालवा,आरोग्य सांभाळा!!प्रदूषण टाळा,पर्यावरण वाचवा !! हा संदेश देत सायकल सफर करून सुमारे 30 कि.मी. वर करंज, जांभूळ ,अशोक ,आवळा अशा सुमारे एक हजार बिया त्यांचे सीडबाॅल यांचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मा. भास्कर कुंभार सर, मा. पोलीस पाटील साहेब व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

1 thought on “निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीने किल्ले मच्छिंद्रगड व सागरेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी सीड बॉल रोपण कार्यक्रम संपन्न

  1. Das ist wirklich interessant. Sie sind ein sehr erfahrener Blogger. Ich bin Ihrem RSS-Feed beigetreten und freue mich darauf, mehr von Ihrem wunderbaren Beitrag zu erhalten. Außerdem habe ich Ihre Website in meinen sozialen Netzwerken geteilt!
    Liana Ernestus Bubalo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *