निलंबन जयंत पाटलांचं अन् शरद पवार अजित पवारांवर नाराज; थेट दिल्लीतून फोन

निलंबन-जयंत-पाटलांचं-अन्-शरद-पवार-अजित-पवारांवर-नाराज;-थेट-दिल्लीतून-फोन

निलंबन जयंत पाटलांचं अन् शरद पवार अजित पवारांवर नाराज; थेट दिल्लीतून फोन म्हणाले…

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 23 डिसेंबर : हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी देखील विरोधकांच्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देत आहेत. दिशा सालियान प्रकरण संसदेत चांगलंच गाजलं. त्यानंतर जयंत पाटील यांनी असंसदीय शद्बाचा वापर केल्यानं त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रम झाले असून, शुक्रवारी विरोधकांकडून सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला होता. मात्र आता जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

 शरद पवारांचा फोन  

मिळत असलेल्या माहितीनुसार जयंत पाटील यांच्या निलंबनावर शरद पवार नाराज आहेत. जयंत पाटलांचे निलंबन झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी थेट दिल्लीमधून अजित पवार यांना फोन करत आपली नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसं न झाल्यानं शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा :  …तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही, राम कदमांची प्रतिज्ञा पूर्ण होणार का?

विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार 

दरम्यान जंयत पाटील यांच्या निलंबनावरून राजकारण चांगलच तापलं आहे. शुक्रवारी विरोधक आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन केलं तसंच दंडाला काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. त्यानंतर विरोधकांकडून सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Ajit pawar, Jayant patil, NCP, Sharad Pawar, Winter session

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *