नाशिक : सातपूरमध्ये घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Last Updated: December 28, 2022, 5:58 PM

घराला आग www.pudhari.news
सातपूर : येथील शिवाजी चौक परिसरात आगीत भस्मसात झालेले घर. (छाया : सागर आनप)

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथील सातपूर गावातील शिवाजी चौकात एका घरात आग लागून संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याची घटना बुधवारी, दि.28 घडली. राज कारभारी सौंदणकर यांच्या घरातून बुधवारी दुपारी काही तरी जळत असल्याचा वास तसेच धूर घरात शेजारील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते दिनकर शिरसाठ यांना दिसून आल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन केला. त्यामुळे अग्निशमन विभागाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्यांसह मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. यात सौंदणकर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रांसह अन्य साहित्य जळून खाक झाले. आग कोणत्या कारणांमुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.

हेही वाचा:

  • लोकसभेची निवडणूक लढविणार नाही : सुशीलकुमार शिंदे
  • पुणे: रसायने चोरांचा छडा लागणार का? नूतन पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर अपेक्षा; कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील वाढत्या चोर्‍या
  • Toyota Hycross : टोयोटाची नवी इनोव्हा हायक्रॉस लॉन्च; जाणून घ्‍या फीचर्स आणि किंमत

संबंधित बातम्या

  • मधुकर www.pudhari.news

    जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

    37 mins ago

  • अपघात

    नाशिक : खडकजांबला अपघातात दुचाकीस्वार ठार

    52 mins ago

Tags

अग्निशमन विभाग घरात आग सातपूर गाव सामाजिक कार्यकर्ते साहित्य जळून खाक

Last Updated: December 28, 2022, 5:58 PM